फुकटे प्रवाशांची शोध मोहीम, तिकीट तपासणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:39 IST2021-09-26T04:39:11+5:302021-09-26T04:39:11+5:30
भाड्याव्यतिरिक्त प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम वसूल करण्यात येणार आहे. प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्याकरिता व विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा ...

फुकटे प्रवाशांची शोध मोहीम, तिकीट तपासणी सुरू
भाड्याव्यतिरिक्त प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम वसूल करण्यात येणार आहे. प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्याकरिता व विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी २२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१ (१५ दिवस) या कालावधीदरम्यान एसटी महामंडळ तिकीट तपासणी मोहीम राबविणार आहे. या मोहिमेत विभागातील मार्ग तपासणी पथकातील व आगारातील सर्व पर्यवेक्षकीय कर्मचारी यांचाही समावेश केला जाणार आहे. यावेळी विनातिकीट प्रवास करताना प्रवासी आढळल्यास त्यांच्याकडून चुकविलेल्या भाड्याव्यतिरिक्त प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम किंवा रुपये १०० यापैकी जी रक्कम अधिक असेल ती दंड म्हणून कसूल करण्यात येईल. त्यामुळे एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे. ही मोहीम ग्रामीण भागासह सर्वत्र सुरू असल्याचे दोंडाईचा आगाराच्या वतीने सांगण्यात आले आहे.