शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयात अडकले ६ हजार ४०० विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:33 IST

मार्च एंडिंग सात दिवसांवर, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कधी मिळणार धुळे : मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत २०२० - २१ या वर्षात ६ ...

मार्च एंडिंग सात दिवसांवर, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कधी मिळणार

धुळे : मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत २०२० - २१ या वर्षात ६ हजार ४०० विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयातच अडकून पडले आहेत. अद्याप ते समाज कल्याण विभागाकडे ऑनलाईन सादर करण्यात आलेले नाहीत. मार्च एंडिंगला अवघे सात दिवस बाकी आहेत. मात्र, तरीही सादर न झालेल्या अर्जांची संख्या लक्षणीय आहे.

जिल्ह्यातील २५८ महाविद्यालयांमध्ये आतापर्यंत १९ हजार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज भरले गेले आहेत. मात्र, त्यापैकी केवळ १२ हजार ६०० अर्ज समाज कल्याण विभागाकडे ऑनलाईन सादर झाले आहेत, तर ६ हजार ४०० विद्यार्थ्यांचे अर्ज अद्याप प्राप्त झाले नसल्याची माहिती समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त हर्षदा बडगुजर यांनी दिली. अनुसूचित जमाती प्रवर्गातील ९० टक्के अर्ज प्राप्त झाले आहेत. उर्वरित अर्ज तत्काळ पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच इतर मागास प्रवर्ग, भटक्या जाती - जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित अर्जांची संख्या जास्त असल्याचे सांगितले. तसेच महाविद्यालयांकडे अर्ज सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यादेखील जास्त आहे. महाविद्यालयाकडून शिष्यवृत्तीचे अर्ज उशिरा सादर झाले तर त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर होऊ शकतो. त्यामुळे महाविद्यालयांनी लवकर अर्ज सादर करण्याची गरज आहे.

तत्काळ अर्ज सादर करा -

मार्च एंडिंग सात दिवसांवर आला आहे. शिष्यवृत्ती योजनेची वेबसाईट सध्या सुरु आहे. साईट कधी बंद होईल, याबाबत सूचना आलेली नाही. मात्र, महाविद्यालयांनी अर्ज लवकर सादर केले, तर २०२० -२१ या आर्थिक वर्षात देयके तयार होऊन विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती मिळेल. यासाठी महाविद्यालयांनी अर्ज तत्काळ पाठवावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या सहाय्य्क आयुक्त हर्षदा बडगुजर यांनी केले आहे.