मालपूर उपसरपंचपदी सावित्रीबाई कोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:38 IST2021-05-21T04:38:16+5:302021-05-21T04:38:16+5:30
उपसरपंच तुकाराम पाटील यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पद रिक्त झाले होते. यासाठी बुधवारी लोकनियुक्त सरपंच मच्छिंद्र शिंदे यांच्या ...

मालपूर उपसरपंचपदी सावित्रीबाई कोळी
उपसरपंच तुकाराम पाटील यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पद रिक्त झाले होते. यासाठी बुधवारी लोकनियुक्त सरपंच मच्छिंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडीसाठी विशेष सभा झाली. यात सावित्रीबाई कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर त्यांचा उपस्थितांनी सत्कार केला. यावेळी सरपंच मच्छिंद्र शिंदेंसह मावळते उपसरपंच तुकाराम पाटील, माजी उपसरपंच जगदीश खंडेराव, कैलास माळी, भारती माळी, ग्रामपंचायत सदस्य संतोष कोळी, अजय साळवे, अरुण धनगर, धनराज इंदवे, बापू शिंदे, देवराम भिल, भुरू भिल, सुनील कोळी, सामाजिक कार्यकर्ते आण्णा मिस्तरी, सुकदेव कोळी, सुभाष ठाकरे, रवींद्र पाटील, सुरेश इंदवे, गोपाल कोळी, युवराज खैरनार आदी मान्यवर उपस्थित होते. सभेचे कामकाज ग्रामविकास अधिकारी एल. सी. पाटील यांनी बघितले. सूत्रसंचालन राजेंद्र पानपाटील यांनी केले.