शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियांचा हैदोस सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 11:19 IST

भल्या पहाटे होतो उपसा : धोबी धवन बंधारा सोडून आता अमरावती नदी पात्रात वळविला मोर्चा

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील दोंडाईचा साक्री रस्त्यालगत धोबी धवन बंधारा सोडून रात्री, भल्या पहाटे पासून अमरावती नदी पात्रातून वाळुचा अवैध उपसा होत असुन यांना कोणाचा धाक उरला नसल्याचे स्पष्ट होते. येथे अक्षरश: या माफियांनी हैदोस घातला असुन महसूल विभागाचा आशीर्वाद असून याला अर्थकारण जबाबदार असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. याबाबत तक्रार करुन देखील पाठिशी घातले जात आहे.येथे वाळु माफियांनी प्रचंड हैदोस घातला असून भल्या पहाटे रात्रीतून उपशाला सुरुवात होत असते. ही वाळुची दोंडाईचा शहरांच्या दिसेने वाहतूक होते. यामुळे दोंडाईचा-मालपूर रस्त्याची देखील दुरवस्था होण्यास वेळ लागणार नाही. मात्र याकडे महसूल विभाग पध्दतशीर डोळे झाक करत आहे . या वाळुची दोंडाईचाहून लांब दिशेने प्रवास होत असल्याचे दबक्या आवाजात सांगितले जाते. यामुळे ट्रॅक्टरधारक देखील लाखोंचा शासनाचा महसूल बुडवित असेल तर याला जबाबदार कोण? यासंदर्भात ‘लोकमत’मधुन वृत्त प्रसारित झाल्यानंतर या वाळु तस्करांनी धोबी धवन बंधारा सोडून अमरावती नदी पात्र निवडले आहे. याकडे कोणी बोट दाखवला त्याचा शोध घ्यावा, असे तेथील शेतकरी भटु रावल यांनी मागणी केली आहे.यापूर्वी देखील अमरावती मध्यम प्रकल्पातून राजरोसपणे अवैध वाळुचा उपसा होत होता. मात्र हा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे या वाळु माफियांनी त्यांचा मोर्चा आता अमरावती नदी पात्र, धोबी धवन बंधारा परिसर तसेच शेतशिवारातील लहान मोठे लवण याकडे वळवला आहे. याआधी सुराय ग्रामस्थांनी त्यांच्या शिवारामधुन काही ट्रॅक्टर पकडून महसूल अधिकाऱ्यांकडे सोपविले होते. मात्र थातुरमाथुर कार्यवाही करुन सोडून दिल्याचे समजते. यामुळे गावकरी आता रिस्क घेण्याचे टाळतात. यामुळे वाळु माफिया फोफावतांना दिसून येत आहेत.यावर्षी प्रचंड पाऊस झाल्याने अमरावती प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. दोन वेळेस पुन्हा भरला असता एवढा पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाळुचा साठा असून अतिशय चांगल्या प्रकारची वाळु असल्यामुळे तिला मोठी मागणी आहे. यामुळे वाळू माफियांचे चांगलेच फावले आहे. येथे वाळुचा कुठल्याही प्रकारचा ठेका दिला नसून अवैध उपसा होत आहे. तरी याकडे महसूल विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन ही वाळु चोरी ताबडतोब थांबवावी, अशी मागणी गावातील ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच केलेल्या तक्रारीची दखल घ्यावी.

टॅग्स :Dhuleधुळे