सामोडे उपकेंद्रास प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा मिळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:36 IST2021-05-13T04:36:15+5:302021-05-13T04:36:15+5:30
सामोडे येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून, गावात काही वर्षांपूर्वी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र होते. परंतु काही अडचणींमुळे ते ...

सामोडे उपकेंद्रास प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा मिळावा
सामोडे येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून, गावात काही वर्षांपूर्वी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र होते. परंतु काही अडचणींमुळे ते शिरसोला येथे स्थलांतर करण्यात आले. सामोडे गावाची लोकसंख्या १५ ते १८ हजार आहे. गावाचा विस्तारही खूप मोठा आहे. येथे फक्त एक आरोग्यसेविका असल्यामुळे या कोरोना काळात लोकांची गैरसोय होत आहे. लसीकरणासाठीदेखील शिरसोला येथे येणारे कमी डोस, त्यातही त्याचे तीन ठिकाणी वाटप होते; त्यामुळे ८ दिवसाला फक्त ५० डोस मिळतात. सामोडे गावाची लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने पिंपळनेर युवासेना तालुका अध्यक्ष अभय शिंदे यांनी आमदार मंजुळा गावीत यांच्याकडे निवेदन देऊन केली. राज्य सरकारशी बोलून हा प्रश्न त्वरित सोडविण्याची मागणी निवेदनात केली आहे.