शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

सालगड्याचा पगार लाखावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:35 IST

गुढीपाडवा आला की शेतकरी आपल्या शेतात काम करण्यासाठी सालदाराचा शोध घेत असतात. परंतु, यंदा शेतात काम करण्यासाठी सालदार एक ...

गुढीपाडवा आला की शेतकरी आपल्या शेतात काम करण्यासाठी सालदाराचा शोध घेत असतात. परंतु, यंदा शेतात काम करण्यासाठी सालदार एक लाख रुपयापेक्षाही जास्त रकमेची मागणी करीत असल्याने तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

मागील अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील बहुतांश मजूर शेतात काम करण्यापेक्षा शहरात जाऊन कोणतेही काम केलेले बरे असे म्हणून शहराकडे कामासाठी निघून जात आहेत. त्यामुळे सालदार मिळणे कठीण झाले आहे. शेतीमध्ये सालदार मिळत नसल्याने व त्यांचे पगार लाखांच्यावर गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. अनेक कारणांमुळे शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने पगार देणे अवघड होऊन बसले आहे.

यंदा सालदारचा पगार कुठे ९० हजार तर कुठे १ लाखांवर गेल्याचे चित्र आहे. स्थानिक भागांमध्ये सालदार मिळत नसल्यामुळे परजिल्ह्यासह परराज्यातून (मध्य प्रदेश) येथून मजूर आणावे लागत आहेत. सहजासहजी सालदार मिळत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने शेती करण्याला पसंती दिली आहे.

अनेक जण बैल मोडीत काढीत आहेत. शेती वाटणीने देण्याची पद्धत ही वाढली असून अर्धा हिस्सा अथवा तिसरा हिस्सा देऊन शेती केली जात आहे. त्यामुळे काम करणाऱ्यासोबत आपल्यालाही हिस्सा मिळत असल्याने संबंधित व्यक्ती चांगले कष्ट करून उत्पादनात वाढ करील आणि त्यातून आपल्याला हिस्सा मिळेल, या उद्देशाने शेती वाटणीने देण्याचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे महागाई वाढत असल्याने सालगड्यांनाही आपल्याला मिळणारा पगार वाढवून द्यावा, अशी अपेक्षा वाटत आहे. शहरात गेल्यावर छोटी-मोठी कामे केली तर त्यातून मिळणाऱ्या पैशांतून आपले कुटुंब बऱ्यापैकी चालते, म्हणून शहरात जाऊन कामे केलेली बरी असा मतप्रवाह मजुरांमध्ये दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी याचा चांगलाच धसका घेतला असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. एकीकडे साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचा मुहूर्त जवळ आलेला असताना तालुक्यातील शेतकऱ्यांना मजुरांचा शोध घ्यावा लागत आहे.

यांत्रिक शेतीवर भर - राज्य व केंद्र सरकारकडून शेती अवजारासाठी अनुदान मिळत असल्याने व मजुरांची उपलब्धता होत नसल्याने तालुक्यातील छोटे-मोठे शेतकरी यांत्रिक शेती करण्याकडे भर देत असल्याचे चित्र आहे. एकीकडे शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करीत आहेत. मात्र, दुसरीकडे सालगड्याची जीवनशैली बदलली असल्याने सालगडी ठरवणे व कराराप्रमाणे काम करून घेणे जिकिरीचे ठरत आहे. ग्रामीण भागातील तरुणांचे शिक्षण झाले आहे, असे म्हणत शेतीतील कामांना टाळत आहेत. मागील पिढीतील युवा शेतकरी काम करण्यास तयार होतात. परंतु, तेही रोजंदारी पद्धतीवर. याचा मोठा परिणाम बटाई(निम्मे) असलेल्या मोठ्या शेतकऱ्यांवर होत असल्याचे चित्र आहे. लाख रुपये मोजनदेखील हवा तसा सालदार मिळत नसल्याची परिस्थिती तालुक्यात दिसून येत आहे.