साक्रीचे पंचायत समिती सदस्य अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 19:00 IST2017-11-23T18:57:01+5:302017-11-23T19:00:22+5:30

वासदरे घाटात दुचाकीला कारने धडक दिल्याने झाला अपघात

Sakri Panchayat Samiti member killed in accident | साक्रीचे पंचायत समिती सदस्य अपघातात ठार

साक्रीचे पंचायत समिती सदस्य अपघातात ठार

ठळक मुद्देअपघातात साक्री पंचायत समितीचे सदस्य पी.एच. पवार ठारपवार मूळचे कासारे येथील रहिवासीसाक्री पंचायत समितीचे भाजपचे सदस्य

आॅनलाईन लोकमत
धुळे, दि.२३ :कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात छडवेल येथील नूतन माध्यमिक शाळेचे शिक्षक व साक्री पंचायत समितीचे सदस्य पी.एच. पवार (५३) हे ठार झाले. ही घटना गुरुवारी सकाळी सात वाजता निजामपूर परिसरात वासदरे घाटात घडली.
पवार गुरुवारी सकाळी दुचाकीने (क्र.एमएच १८-एस.९२८९) छडवेल येथे जात होते. वाटेत निजामपूर भागातील वासदरे घाटात त्यांच्या दुचाकीला समोरून येणाºया कारने (क्र. जी.जे.५- २५०३) जोरदार धडक दिली. त्यात ते जबर जखमी झाले. त्यांना साक्री रूग्णालयात नेत असतांना, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. ते साक्री पंचायत समितीचे भाजपचे सदस्य होते. पवार हे मूळचे कासारे येथील रहिवासी होते. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Sakri Panchayat Samiti member killed in accident