शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी क्लब फेमिना अध्यक्षपदी कल्पना अहिरे, मेघा कामेरकर सचिव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 21:08 IST

पदग्रहण समारंभ : महिला, शेतकऱ्यांसाठी काम करण्याचा संकल्प

धुळे : येथील महिलांचा रोटरी क्लब आॅफ धुळे फेमिनाच्या अध्यक्षपदी कल्पना दीपक अहिरे तर सचिवपदी मेघा विलास कामेरकर यांची निवड करण्यात आली. त्यांचा आणि कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ १७ जुलै रोजी अजमेरा आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या सभागृहात आॅनलाईन पध्दतीने नुकताच पार पडला़रोटरी क्लबचे डीस्ट्रीक्ट गव्हर्नर प्रशांत जानी यांनी पदाची शपथ दिली. यावेळी आशिषजी अजमेरा, महेश कुलकर्णी, सिद्धनाथ गरुड, आशिष पटवारी, हिता जानी उपस्थित होते. कल्पना अहिरे यांनी अध्यक्षपदाचा पदभार मावळत्या अध्यक्षा दीप्ती गोटी यांच्याकडून स्वीकारला तर मेघा कामेरकर यांनी सेक्रेटरी पदाचा पदभार श्वेता देशपांडे यांच्याकडून स्वीकारला.रोटरी क्लबच्या नवीन कार्यकारिणीत मेघा कामेरकर, उपाध्यक्षा निकिता अग्रवाल, खजिनदार अनिता पाटील, रितू पटवारी , राजेश्वरी गांधी, श्वेता देशपांडे, राणू अजमेरा, नयना वाणी, रचना शिंदे तर सदस्य म्हणून कविता कुचेरिया, मेघा शिंपी, दीप्ती गोटी, स्मिता अजमेरा, ड्रीम प्रोजेक्टसाठी वैशाली लहामगे, साधना पटनी, वैशाली पाटील, मोनाली थोरात यांची निवड करण्यात आली आहे. पदग्रहण समारंभानिमित्त रोटरी क्लब फेमिनातर्फे धुळे येथील भोलेबाबा नगर परिसरातील मोकळ्या जागेत वृक्ष लागवड करण्यात आली.सामाजिक दातृत्व म्हणून वर्षभर सामाजिक, शैक्षणिक गरजा, आरोग्य शिबीर तसेच निराधार, विधवा व घटस्फोटीत महिलांसाठी विविध आवश्यक शिबीर आयोजित करण्याचा तसेच ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांसाठी नाला खोलीकरण, जुने बंधारे दुरूस्ती करुन पाण्याची साठवण क्षमता वाढविण्यासाठी काम करण्याचा मानस नवनियुक्त अध्यक्षा कल्पना अहिरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला़रोटरी क्लबतर्फे नेहमी सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबविले जातात़

टॅग्स :Dhuleधुळे