शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

देवपुरातील रस्ते सोमवारपासून दुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 10:09 PM

महापालिका : कामांची गुणवत्ता तपासूनच देयके अदा करा : बैसाणे

धुळे : भूमिगत गटारीच्या कामामुळे देवपुरातील बहुतांश रस्त्यांची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे़ वर्दळीच्या रस्त्यांसह कॉलनी भागात देखील मोठी समस्या निर्माण झाली आहे़ सोमवारपासून संबंधित ठेकेदार रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेणार असून कामांची गुणवत्ता तपासल्यानंतरच त्याची देयके अदा करावीत असे निर्देश स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे यांनी बैठकीत दिले़देवपुर भागात सर्वत्र भूमिगत गटार योजनेचे पाईप लाईन टाकणे, चेंबर बसविणे अशी विविध कामे सुरु होती़ सदर झालेल्या कामांमुळे देवपुर भागातील बहुतांश रस्ते सदरच्या कामांमुळे खोदण्यात आले होते़ त्यामुळे रस्त्यांची अवस्था खराब झाली होती़ नुकताच पावसाळा सुरु झाल्याने याबाबत नागरीकांच्या तक्रारीत वाढ होऊन त्यांचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले होते़ त्यामुळे या विषयाबाबत तातडीने निर्णय घेण्यासाठी स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे यांनी बैठकीचे आयोजन केले होते़या बैठकीत देवपूर भागातील नगरसेवकांनी तक्रारी मांडल्या़ यावर सभापती बैसाणे यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना कामांच्या सद्यस्थितीबाबत व काम सुरु करण्याबाबत विचारणा करुन कारवाई करण्याचा इशारा दिला़ लॉकडाऊनमुळे शासनाचे आदेश असल्याने काम बंद होते़ त्यामुळे काम होऊ शकले नव्हते़ याबाबत सोमवारपासून रस्ते दुरुस्तीचे काम संबंधित ठेकेदारांमार्फत हाती घेण्यात येणार असून प्राधान्यक्रमांकाने रहदारी असलेले देवपुरातील प्रमुख रस्ते दुरुस्त करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला़ तसेच कामांची गुणवत्ता तपासून देयके अदा करावीत़ याबाबत महापालिकेशी समन्वय ठेवून दैनंदिन कामकाजाची पाहणी करावी़ ज्या कामांची गुणवत्ता नाही किंवा काम खराब झालेले आहे, असे काम पुनश्च दुरुस्त करावे़ रस्ते दुरुस्तीचे काम एक महिन्याच्या आत पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी, असा प्रकारचा निर्णय बैठकीत घेण्यात आला़ तसेच नगरसेवकांनी संबंधित ठेकेदार किंवा महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या अधिकाऱ्यांना कामांसंदर्भात तक्रारी केल्यास त्याबाबत त्यांना तात्काळ समाधानकारक खुलासा करावा, असेही बैठकीत आदेशित करण्यात आले़ यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, आयुक्त अजीज शेख, एमजीपीचे कार्यकारी अभियंता निकम, उपअभियंता पाटील, सहायक अभियंता धोत्रे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, ठेकेदार उपस्थित होते़

टॅग्स :Dhuleधुळे