कोरोना झाल्यानंतरच अन्य आजारांची धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:26 IST2021-06-06T04:26:57+5:302021-06-06T04:26:57+5:30

धुळे जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळून आले आहेत. योग्य उपचारानंतर अनेकांना घरी सोडण्यात आले आहेत. मात्र ...

Risk of other diseases only after corona | कोरोना झाल्यानंतरच अन्य आजारांची धोका

कोरोना झाल्यानंतरच अन्य आजारांची धोका

धुळे जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळून आले आहेत. योग्य उपचारानंतर अनेकांना घरी सोडण्यात आले आहेत. मात्र कोरोना झाल्यानंतर रोग प्रतिकार शक्ती कमी होते. त्यामुळे अशा रूग्णांना जबड्यातील बुरशिजन्य आजार, मधुमेह होण्याचे प्रमाण वाढले आहे. या आजाराला घाबरून जाण्याचे कारण जरी नसले तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे. या आजारावरील औषधी महागड्या असंल्याने केंद्र व राज्य सरकारकडून मोफत दिल्या जात आहे. हिरे महाविद्यालय व जिल्हा रूग्णालयात रूग्णांना उपचाराची व्यवस्था करण्यात आलेली असल्याची माहिती म्यूकरमायकोसिसचे जिल्हा नोडल अधिकारी डाॅ. नितीन पाटील यांनी दिली

प्रश्न : म्युकरमायकोसिस आजार काय आहे व आजाराची लागण कशी होते.?

उत्तर : म्यूकरमायकोसिस हा एक बुरशीजन्य आजार आहे. हा आजार प्रामुख्याने अशा लोकांना होतो, ज्यांना आधिपासूनच एखादा आजार आहे किंवा जे लोक अशा काही औषधींचे सतत सेवन करतात ज्यामुळे त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी होते किंवा इतर आजारांशी लढण्याची ताकद कमी होते. सध्या कोरोनातून बरे झालेले रूग्णांची रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने त्यांना म्युकरमायकोसिसचा धोका जास्त असतो.

प्रश्न : म्युकरमायकोसिस सर्वाधिक धोका कोणाला असतो?

उत्तर : जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेले रूग्ण संख्या अधिक आहे. त्यामुळे कोरोना झालेल्या रूग्णांची रोग प्रतिकार शक्ती कमी होते. तसेच जर मधुमेह असलेल्यांना रूग्णांला कोरोना झाला तर त्यांची रोग प्रतिकार शक्ती अधिक कमी होते. त्यामुळेे अशा लोकांना म्यूकरमायकोसिसचा धोका जास्त असतो. लक्षणे दिसून आल्यास तातडीने उपचार करावा.

प्रश्न : म्युकरमायकोसिस आजाराचे लक्षणे काय आहेत.?

उत्तर नेहमी जाणवणारी डोकेदुखी, अंगात बारीक ताप, गालावर सूज, हिरड्यांमधून पू येणे, पुळया येणे, डोळ्याना सुज येणे, डोळ्यांची हालचाल कमी होणे, चेहऱ्यावर सूज असलेली त्वचा काळी पडणे, डोळा पुढे आल्यासारखा वाटणे, वरच्या जबडयातील दात हलने त्यात वेदना होणे, नाकावर अथवा वरच्या जबडयातील त्वचा काळी पडणे अशी लक्षणे आढळतात. लक्षणे दिसल्यास उपचार करावा.

म्यूकरमायकोसिस संसर्गजन्य नाही

म्यूकरमायकोसिस आजार एका व्यक्तिपासून दुसऱ्याला होत नाही. म्यूकरमायोसिस हा एक बुरशीजन्य आहे असून शरीराच्या ज्या भागात याची लागण होते, त्याला तो नष्ट करतो. मात्र, वेळेत योग्य उपचार घेतल्यास यापासून वाचता येऊ शकते. या आजाराला घाबरून जाण्याचे काम कारण नाही. मात्र दुर्लक्ष करून देखील चालणारे नाही.

म्यूकरमायकोसिस जिल्ह्यात २५० रूग्ण

कोरोनातून बरे झालेले बहूतांश रूग्ण म्यूकर मायकोसिस आजाराचे आढळून आलेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत म्यूकोरमायकोसिस या बुरशिजन्य आजाराचे २०० ते २५० रुग्ण आढळून आलेत. दरम्यान आतापर्यत जिल्हयातील तीन रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.

मोफत उपचार

महात्मा फुले जीवनदायी योजनेत या आजाराचा समावेश करण्यात आल्याने खाजगी व सरकारी रूग्णालयातून मोफत उपचार होत आहे.

Web Title: Risk of other diseases only after corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.