धुळ्यात निवृत्त उपनिरीक्षकाची पोलिसाला शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 21:56 IST2020-01-14T21:55:41+5:302020-01-14T21:56:03+5:30

कारवाई केल्याचा राग, आरडा ओरडही केली

Retired Deputy Inspector of Police in Dhule | धुळ्यात निवृत्त उपनिरीक्षकाची पोलिसाला शिवीगाळ

धुळ्यात निवृत्त उपनिरीक्षकाची पोलिसाला शिवीगाळ

धुळे : नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारावर वाहतूक पोलिसाने कारवाई केली. याचा राग येऊन सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाने कारवाई करणाºया पोलीस कर्मचाºयाला अरेरावी व शिवीगाळ करुन धमकविल्याची घटना शहरातील मालेगाव रोडवर घडली.
शहरात रस्ता सुरक्षा सप्ताह सुरु आहे़ सोमवारी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास मालेगाव रोडवरील बीएसएनएल आॅफिसजवळ शहर वाहतूक शाखेचा पोलीस कर्मचारी पी़ व्ही़ खैरमोडे यांनी वाहतुकीचे नियम मोडणाºया एका दुचाकीस्वारावर कारवाई केली़ मात्र, तो दुचाकीस्वार सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक निजाम सैय्यद यांच्या घराचे बांधकाम करणारा होता़ म्हणून माहिती मिळाल्यानंतर निवृत्त उपनिरीक्षक सैय्यद यांनी त्याठिकाणी जाऊन कारवाई करणाºया पोलिसाला विरोध करीत शिवीगाळ केली़ तुम्ही हप्ते गोळा करतात, माझ्याकडून १ लाख रुपयांची खंडणी मागतात, तुमची एसपींकडे तक्रार करेल अशी धमकी दिली आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केला़ याप्रकरणी संशयित सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक निजाम सैय्यद यांच्या विरुध्द शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला़

Web Title: Retired Deputy Inspector of Police in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे