यावेळी पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भालचंद्र सोनगत, व्यापारी आघाडीचे सलीम शिकलकर, हाफिज शेख, दादा कर्पे, शहराध्यक्ष इम्रान पठाण, रोहित चांगरे, प्रशांत वाघ, जय साळुंखे आदी उपस्थित होते. धुळे ते चाळीसगाव रेल्वेसेवा बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. जिल्ह्यातून शिक्षण, व्यापार, वैद्यकीय कारणासाठी मुंबई व पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. धुळ्याहून थेट मुंबईला रेल्वेने जाता येते, पण ही सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. रेल्वेसेवा पूर्ववत सुरू करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. याविषयी खासदार डॉ.सुभाष भामरे यांनाही निवेदन देण्यात आले. दरम्यान, रेल्वेसेवा बंद असल्याने नागरिकांना चाळीसगावला जाण्यासाठी बस किंवा खासगी वाहनांची मदत घ्यावी लागते. वाहनांचे भाडे रेल्वेपेक्षा जास्त असल्याने रेल्वे सुरू करावी, अशी मागणी झाली.
धुळे-चाळीसगाव रेल्वेसेवा पुन्हा सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:45 IST