दोंडाईचा येथे पहिल्या दिवशी बंदला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:32 IST2021-03-15T04:32:12+5:302021-03-15T04:32:12+5:30
कोरोनाबाधित रुग्ण वाढू नये, कोरोना खंडित होण्यासाठी जागरूक दोडाईचा येथे जनता कर्फ्यू सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून ...

दोंडाईचा येथे पहिल्या दिवशी बंदला प्रतिसाद
कोरोनाबाधित रुग्ण वाढू नये, कोरोना खंडित होण्यासाठी जागरूक दोडाईचा येथे जनता कर्फ्यू सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून दोडाईचामध्ये तीन दिवशीय जनता कर्फ्यूला सुरुवात झाली आहे. आज रविवार ते मंगळवारदरम्यान हा जनता कर्फ्यू सुरू आहे.
आज फक्त दवाखाने व मोजकी औषध दुकाने सुरू होती. रविवार असल्याने बँका पण बंद आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवारपर्यंत बंद आहे. कर्फ्यू असल्याने प्रवासी न आल्याने बस स्टॅण्ड व रेल्वे स्टेशनवर शुकशुकाट होता.
किराणा, भाजीपाला, सोने-चांदी, कापड व इतर सर्वच दुकाने बंद आहेत. त्यामुळे दोंडाईचामध्ये शांतता दिसली. दोडाईचामधील स्टेशन भागासह इतर मुख्य रस्ते निर्मनुष्य दिसले. ग्रामीण भागातील जनता बंद असल्याने फिरकले नाहीत. त्यामुळे दोंडाईचामध्ये पहिल्या दिवसाच्या जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. दोंडाईचा बंद होते. विनामास्क फिरणारे व फिजिकल डिस्टन्स न पाळणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, सोमवारी येथे लग्न असून, ५० पेक्षा जास्त जण आढळून आल्यास आयोजकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिली. जनतेने जनता कर्फ्यूला प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.