शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना चाचणीचे अहवाल त्वरीत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 21:43 IST

शिवसेना : लक्षणे असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात भरती करा

धुळे : कोरोना चाचणीचा अहवाल तीन ते चार दिवस उशिरा प्राप्त होत असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे संशयित रुग्णांचा कोरोना अहवाल त्वरीत मिळेल असे नियोजन करावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.यासंदर्भात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, सह संपर्क प्रमुख अतुल सोनवणे, राजेंद्र पाटील, प्रियंका जोशी, गुलाब माळी, नंदलाल फुलपगारे, डॉ. जयश्री वानखेडकर आदींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने तपासणी देखील वाढली आहे. त्यामुळे संशयित रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल तीन ते चार दिवस उशिरा मिळत आहे. त्यातील काही रुग्णांना कोरोनाची लक्षणे आहेत तर काही रुग्णांना लक्षणे नाहीत. ज्या रुग्णांना लक्षणे आहेत त्यांना देखील अहवाल प्राप्त होईपर्यंत रुग्णालयात किंवा विलगीकरण कक्षात दाखल करुन घेतले जात नाही. असे रुग्ण घरी जातात तसेच बाहेरही वावरतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. शिवाय अहवाल उशिरा प्राप्त होत असल्याने उपचारास देखील उशिर होत आहे. त्यामुळे मृत्यूदर वाढला आहे. अशा परिस्थितीत कोरोनावर मात करायची असेल तर कोरोचा अहवाल त्वरीत द्यावा, लक्षणे असणाºया रुग्णांना रुग्णालयात तसेच विलगीकरण कक्षात दाखल करुन घ्यावे, हिरे वद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय आणि महानगरपालिका कोवीड सेंटरमध्ये बेडची संख्या वाढवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या पध्दतीने उपाययोजना केल्या तर मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल असेही निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे