धुळे येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे यांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 11:22 IST2019-06-07T11:20:52+5:302019-06-07T11:22:07+5:30
अहिरे यांच्याकडे प्राथमिकचाही होता प्रभारी पदभार

धुळे येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे यांची बदली
आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे यांची पुणे येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात सहायक संचालकपदी बदली झाली आहे. त्यांच्या रिक्तजागी यापूर्वीच मुंबई विभागीय शिक्षण मंडळाचे सहसचिव डॉ. सुभाष रमेश बोरसे यांनी नियुक्ती झालेली आहे. डॉ. बोरसे यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही.
प्रविण अहिरे हे १९ जुलै २०१७ वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते.
२४ डिसेंबर २०१८ पासून त्यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी तसेच निरंतन शिक्षण विभागाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आलेला होता.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे राज्यातील सात शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश ४ जून रोजी काढले.
त्यात धुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे यांचाही समावेश असून, त्यांची पुण्याला सहायक संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
दरम्यान आपला कार्यकाळ चांगला राहिला, शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले. तसेच दहावी-बारावीच्या परीक्षाही कॉपीमुक्त वातावरणात पार पडल्याचे प्रविण अहिरे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.
डॉ. बोरसे पदभार स्वीकाणार
माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्त झालेले डॉ. सुभाष बोरसे हे पुढील आठवड्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून पदभार स्वीकारतील असे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.