शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीय पदोन्नतीचा अन्यायकारक निर्णय रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:37 IST

धुळे : आरक्षणाशिवाय सेवाज्येष्ठतेनुसार मागासवर्गीय पदोन्नतीमधील सर्व रिक्त जागा भरण्याचा राज्य सरकारने घेतलेला अन्यायकारक निर्णय त्वरित रद्द करावा, ...

धुळे : आरक्षणाशिवाय सेवाज्येष्ठतेनुसार मागासवर्गीय पदोन्नतीमधील सर्व रिक्त जागा भरण्याचा राज्य सरकारने घेतलेला अन्यायकारक निर्णय त्वरित रद्द करावा, अशी मागणी करीत ऑल इंडिया पँथर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासकीय नोकरीमधील पदोन्नतीतील आरक्षण सेवाज्येष्ठतेनुसार लागू करण्याचा निर्णय महाआघाडी सरकारने २० एप्रिल रोजी घेतला होता. पदोन्नतीमधील ३३ टक्के आरक्षित पदे रिक्त ठेवून खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचे आदेश होते. आता ७ मे रोजी शासनाने नवीन शासन निर्णय काढला असून सर्व रिक्त जागा २५ मे २००४ च्या स्थितीनुसार सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे यापुढे आरक्षणानुसार नव्हे तर सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती दिली जाणार आहे. यापूर्वी मागासवर्गीय समाजासाठी ३३ टक्के आरक्षित रिक्त पदेदेखील आता आरक्षणाशिवाय सेवाज्येष्ठतेनुसार भरली जाणार आहेत. पदोन्नतीमध्ये बिंदू नामावलीचा जो क्रम होता तो देखील रद्द केलेला आहे. हा निर्णय घटनाबाह्य आहे. त्यामुळे अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे या प्रवर्गातील अधिकारी, कर्मचारींमध्ये नाराजी पसरली आहे. सरकारच्या या आरक्षण विरोधी निर्णयाचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. सोशल मीडियातूनही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर जिल्हाध्यक्ष सागर मोहिते, शहराध्यक्ष आकाश बैसाणे, कायदेशीर सल्लागार ॲड. विलास भामरे, जितेश सोनवणे, नीलेश मोरे, छोटू बोरसे, माया पानपाटील, भाऊसाहेब बळसाणे, सय्यदअली, पंकज भालेराव, भिकन घोलप, सुदर्शन खैरनार, बापू नागमल, आकाश कदम, आकाश बाविस्कर, कृष्णा ढिवरे, सागर शिरसाठ, शुभम येवले, समीर पठाण आदींच्या सह्या आहेत.