महामार्गांची त्वरीत दुरूस्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 23:25 IST2020-02-25T23:24:45+5:302020-02-25T23:25:07+5:30
ट्रकमालकांची मागणी : वाहने नादुरूस्त, चालक-वाहक बेजार

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मुंबई - आग्रा आणि सुरत - नागपूर या महामार्गांची त्वरीत दुरुस्ती करावी, अशी मागणी धुळे जिल्हा ट्रक मालक असोसिएशन आणि उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स असोसिएशन संघर्ष समिती धुळे यांनी मंगळवारी केली़
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रस्त्यांची अवस्था इतकी दयनीय आहे की एका दिवसात एका निश्चित ठिकाणी पोहोचणाºया वाहनाला दोन ते तीन दिवस लागत आहेत़ रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे वाहने देखील नादुरूस्त होत आहेत़ तसेच मालवाहू अवजड वाहनांना अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे़ त्यामुळे ट्रकमधील मालाचे नुकसान होत असून ट्रकचालक आणि क्लिनर देखील जखमी होत आहेत़ शिवाय सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पुरवठ्यावरही त्याचा परिणाम होत आहे़ त्यामुळे रस्त्यांची त्वरीत दुरुस्ती करावी अशी मागणी उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स असोसिएशनचे सेके्रटरी मनोज राघवन, धुळे जिल्हा ट्रक मालक असोसिएशनचे अध्यक्ष मनोहर चौधरी, खान्देश ट्रक ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष यांच्यासह ट्रकमालक आणि चालकांनी केली आहे़