वसुली निरीक्षकास विनापरवानगी रजा पडली महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 10:24 PM2019-03-15T22:24:29+5:302019-03-15T22:25:17+5:30

शुक्रवारी निलंबित करण्याचे आदेश दिले़

The recovery inspector rejected the unauthorized leave | वसुली निरीक्षकास विनापरवानगी रजा पडली महागात

dhule

Next

धुळे : महापालिका कर विभागातील ्रप्रभारी मालमत्ता कर निरीक्षक म्हणुन जबाबदारी सांभाळणाऱ्या शिरीष जाधव यांनी विनापरवानगी रजा घेतल्याने उपायुक्तांनी त्यांना शुक्रवारी निलंबित करण्याचे आदेश दिले़
महापालिका प्रशासनाकडून सध्या मार्च एन्डीगनिमित्त विविध करवसुली, थकबाकीवर भर दिला जात आहे़ त्यासाठी मोठ्या प्रमाणात कर भरण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे़
मनपा कर विभागात प्रभारी कर निरीक्षक म्हणुन कार्यरत असलेले शिरीष जाधव यांच्यावर मालमत्ता कर निरीक्षक प्रभारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती़
जाधव यांनी ६ मार्चपासुन विना परवानगी रजेचा अर्ज देऊन रजेवर निघुन गेले आहे़ दरम्यान जाधव यांनी आपल्या भ्रमणध्वनी रजेच्या कालावधीत बंद असल्याने कार्यालयीन कामकाजात मोठ्या प्रमाणात अडचणनिर्माण होत आहे़ त्यांच्या भागातील मालमत्ता धारकांचे कुठल्याही प्रकारची कामे कार्यालयीन वेळत पुर्ण होत नसल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे़ तर थकबाकीधारकांसाठी १७ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालत कार्यक्रमात सुनावणी होणार आहे़ मात्र त्यांच्या भागातील माहिती लिपीकाकडून पूर्ण झालेली नाही़
कार्यालयीन शिस्तीचा भंग करणे, हलगरर्जीपणा तसेच महापालिका अधिनियम १९४९ चे कलम ५६ (२) नुसार शिरीष जाधव यांना मनपा सेवेतुन निलंबित करण्यात आले आहे तर जाधव यांची नोंद सेवा पुस्तकात घेण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे़ दरम्यान या कारवाईमुळे सर्वत्र चर्चा होत असून महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती बसली आहे.

Web Title: The recovery inspector rejected the unauthorized leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे