शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हा रूग्णालयातील परिचारिकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 13:30 IST

दोंडाईचा : कोरोनाच्या काळात केलेल्या कार्याची रोटरी क्लब आॅफ सिनिअर्सने घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : दोंडाईचा शहर व परिसरातील कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा करणारे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व परिचारीका यांचा रोटरी क्लब आॅफ दोडाईचा सिनियर्स मार्फत सत्कार करण्यात आला. रोटरीचे गव्हर्नर प्रशांत जानी व हिता जानी यांच्याहस्ते गुलाबपुष्प व प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.प्रशांत जानी म्हणाले की, कोरोनाच्या काळात दोंडाईचा रोटरी सिनियर्सने कोरोना बाबत चांगले कार्य केले आहे. राजेश मुणोत यांनी सांगितले की कोरोनाच्या संकटकाळात प्रत्येक व्यक्ती आपल्या घरात सुरक्षित होता. पण कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांच्या वार्डात अहोरात्र सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी व परिचारीका यांचे योगदानामुळे आज दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातुन हजारो रुग्ण बरे होऊन सुखरूप घरी परतले आहेत.उपजिल्हा रुग्णालयातील व रोटरी कोविड केद्रांतील सर्व रुग्णांना प्रोटीन पावडरचे डबे तसेच सर्व कर्मचारी यांना सँनिटायझर व मास्क वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर अनिष शहा, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्जुन नरोटे, डॉ. हितेंद्र देशमुख, डॉ. सचिन पारख,डॉ. प्रफुल्ल दुग्गड, रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष चेतन सिसोदिया, इनरव्हीलच्या अध्यक्षा मयुरा पारख, सचिव स्मितल गोस्वामी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी सिनियर्सचे सचिव राजेश माखिजा, रविंद्र पाटील, सौरभ मुणोत, प्रविण महाजन, डॉ. राजेंद्र पाटील, महेंद्र चोपडा, सौरभ अग्रवाल यांनी केले.