धुळ्यानजिक महामार्गावर रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 12:24 IST2019-01-05T12:22:28+5:302019-01-05T12:24:33+5:30

कुंडाणे फाटा : गतिरोधकाची ग्रामस्थांची मागणी

Rastaroko on the Dhythical Highway | धुळ्यानजिक महामार्गावर रास्तारोको

धुळ्यानजिक महामार्गावर रास्तारोको

ठळक मुद्देकुंडाणे फाट्यावर रास्तारोको आंदोलनगतिरोधक बसविण्याची ग्रामस्थांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरानजिक मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर कुंडाणे फाटानजिक ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास रास्तारोको आंदोलन केले़ यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ 
शुक्रवारी दुपारी या ठिकाणी दुचाकी अपघात झाल्याने एका तरुणाचा जीव गेला होता़ तर अन्य एक जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ यामुळे या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसविण्यात यावे अशी एकमुखी मागणी घेऊन कुंडाणे ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत़ त्यांनी अचानक रास्तारोको आंदोलन छेडल्याने प्रशासनाची धांदल उडाली़ पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे़ 

Web Title: Rastaroko on the Dhythical Highway