शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात सहायक पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की; एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 22:25 IST

साक्री रोडवरील पहाटेची घटना, शहर पोलिसात गुन्हा दाखल

धुळे : चौकात का थांबला, निघून जा असे सांगणाऱ्या गस्तीवरील पोलिसांना शिवीगाळ करीत सहायक पोलीस निरीक्षकाला धक्का देण्याची घटना साक्री रोडवरील कुमारनगर परिसरात सोमवारी पहाटे साडेतीन ते पावणेचार वाजेच्या सुमारास घडली. त्याचक्षणी पोलिसी खाक्या दाखवत चंदन ऊर्फ चिन्नू पोपली (रा. कुमार नगर, साक्री रोड) याच्या मुसक्या आवळल्या. त्याला ताब्यात घेण्यात आले. पहाटे साडेपाच वाजताच त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.साक्री रोडवरील कुमारनगर भागातील एका चौकात चिन्नू पोपली हा पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास उभा होता. त्याचवेळेस शहर पोलिसांचे गस्तीवरील पथक तिथे आले. त्यांनी त्याला चौकात का उभा आहे, घरी निघून जा असे सांगितले. पण चिन्नू तिथून न जाता उलट जात नाही, काय करायचे करून घ्या असे उद्धटपणे बोलला. त्याला समजून सांगण्यासाठी गस्तीवर असणारे सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील यांनी आपल्या शासकीय वाहनातून खाली उतरले आणि त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. पण, उलट चिन्नूने पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दादासाहेब पाटील यांचा हात पकडून त्यांना जोराचा धक्का दिला. यावेळी त्यांच्या हाताला खरचटले. शिवीगाळ करत एकेकाला बघून घेईन, जिवंत सोडणार नाही अशीही धमकी दिली.लागलीच त्याला पोलिसी खाक्या दाखवित त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला ताब्यात घेत असताना शासकीय गणवेशाची दोन बटने तुटली. त्याला शहर पोलीस ठाण्यात आणून त्याच्या विरोधात सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील यांनी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली. त्यानुसार चंदन ऊर्फ चिन्नू पोपली याच्या विरोधात भादंवि कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एस. पी. तिगोटे घटनेचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे