शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

करवसुलीची उद्दिष्टपूर्ती बंधनकारक!

By admin | Updated: March 3, 2017 00:02 IST

धुळे : शहरातील थकबाकीदार मालमत्ताधारकांवर कारवाई करून मार्च महिन्यात १०० टक्के करवसुली करण्याचे आदेश नगरविकास विभागाने काढले आहेत़

धुळे : शहरातील थकबाकीदार मालमत्ताधारकांवर कारवाई करून मार्च महिन्यात १०० टक्के करवसुली करण्याचे आदेश नगरविकास विभागाने काढले आहेत़ त्यामुळे करवसुलीसाठी संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करणार असून थकबाकीदारांच्या याद्या प्रसिद्ध करणार असल्याची माहिती आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली़वाढत्या नागरिकरणामुळे येणाºया जबाबदाºया व कर्तव्य स्वत:च्या आर्थिक क्षमतेवर महापालिकांनी पार पाडणे शासनाला अपेक्षित आहे़ मालमत्ता करापासून प्राप्त होणारे उत्पन्न हे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महसुलाचे मुख्य स्त्रोत असून प्रभावी करवसुली झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक सक्षमता वाढणार आहे़ काही मालमत्ताधारकच कर भरणे टाळत असतात़ परिणामी, २० टक्के मालमत्ताधारकांकडे ८० टक्के कर थकीत असतो़ त्यामुळे अशा थकबाकीदारांवर करवसुलीसाठी ठोस कार्यवाही आवश्यक आहे, असे नगरविकास विभागाने काढलेल्या आदेशात नमूद आहे़ त्याचप्रमाणे आयुक्तांना २०१६-१७ मध्ये महसूल वाढीसाठी ९० टक्क्यांपेक्षा अधिक कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ सदर उद्दिष्टांची पूर्तता करणे आयुक्तांना बंधनकारक आहे़  त्यामुळे महापालिकांनी ३१ मार्चपर्यंत मालमत्ता कर व पाणीपट्टीची १०० टक्के वसुली करावी, त्यासाठी विशेष मोहीम राबवावी, असे आदेश नगरविकास विभागाने काढले आहेत़दरम्यान, शासनाच्या आदेशानंतर प्रशासनाने थकबाकी वसुलीचे नियोजन सुरू केले असून थकबाकीदार मालमत्ताधारक व पाणीपट्टीधारकांच्या याद्या तयार केल्या आहेत़ सदरच्या याद्या वृत्तपत्रातून तसेच डिजिटल बॅनर्सद्वारे प्रसिद्ध केल्या जाणार असून त्यानंतर थकबाकीदारांवर कारवाई केली जाणार आहे़ त्याचप्रमाणे महापालिकेची संपूर्ण यंत्रणा करवसुलीच्या कामास लावली जाणार असून वेगवेगळी पथके तयार करून या पथकांकडून कारवाईदेखील केली जाणार आहे़ महापालिकेने यंदा नोटाबंदीनंतर जवळपास १५ कोटी रुपयांची वसुली केली असून त्यात मालमत्ता कर व पाणीपट्टीचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे़ मात्र अजूनही मालमत्ताधारकांकडे १२ कोटी रुपयांची थकबाकी असल्याने या थकबाकीच्या वसुलीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आयुक्त संगीता धायगुडे यांनी स्पष्ट केले़ केवळ मालमत्ताधारकच नव्हे तर मनपा क्षेत्रातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांकडे असलेली थकबाकीदेखील तातडीने वसूल करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत़ जिल्हाधिकाºयांनी संबंधित कार्यालयांना थकबाकी भरण्याच्या सूचना द्याव्यात, असे शासनाने स्पष्ट केले आहे़ जे थकबाकीदार मालमत्ता कर भरणार नाही, त्यांच्यावर अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई करून ३१ मार्चपर्यंत वसुली मनपाला करावी लागणार आहे़ त्याचप्रमाणे विशेष वसुली मोहिमेचा अहवालदेखील शासनाला २० एप्रिलपर्यंत सादर करावा लागणार असल्याने मनपाकडून विशेष मोहीम सुरू केली जाणार आहे़ महापालिकेकडून सध्या शास्ती माफीची मोहीमदेखील राबविली जात आहे़ अर्थात, या मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद नसला तरी वसुलीच्या रकमेत मागील वर्षाच्या तुलनेत निश्चितपणे मोठी वाढ होणार आहे़