धुळे : चाळीसगाव रोडवरील पवननगर भागात रस्त्याने जाणाऱ्या महिलेची सोनपोत दुचाकीवरुन आलेल्या दोघा भामट्यांनी खेचून पोबारा केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली़ याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात रात्री गुन्ह्याची नोंद झाली़पारोळा रोडवरील असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात असलेल्या पवन नगरात राहणाºया सुनंदा राजाराम बडगुजर (५७) वर्षीय महिला गुरुवारी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास चाळीसगाव रोडवर पवन नगरात पांडूरंग पॅलेस बंगल्यासमोरुन पायी जात होत्या़ त्याचवेळेस दोन जण मोटार सायकलीवरुन भरधाव वेगाने आले आणि दोघा अनोळखींनी त्यांच्या गळ्यातील सोनपोत ओढून घेत पोबारा केला़ क्षणार्धात घडलेल्या या घटनेमुळे सुरुवातीला या महिलेला काही कळलेच नाही़ त्यानंतर आपल्या गळ्यातील सोनपोत लांबविली असल्याचे लक्षात आल्यानंतर तिने आरडा ओरड केली़ पण तोपर्यंत सोनपोत खेचणारे घटनास्थळावरुन पळून जाण्यात यशस्वी ठरले़ लंपास केलेली सोनपोत ही दीड तोळे वजनाची ४५ हजार रुपये किं मतीची आहे़ सुनंदा बडगुजर या महिलेने आझादनगर पोलीस ठाणे गाठत गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल दिल्याने गुन्हा दाखल झाला़ पोलीस उपनिरीक्षक एम़ जे़ सय्यद घटनेचा तपास करीत आहेत़
धुळ्यात महिलेची सोनपोत खेचली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 22:27 IST