दोंडाईच्यात शनिवारपासून जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 12:07 PM2020-07-17T12:07:18+5:302020-07-17T12:07:39+5:30

जनतेची होती मागणी : नगरपालिका, पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला निर्णय

Public curfew in Dondai from Saturday | दोंडाईच्यात शनिवारपासून जनता कर्फ्यू

dhule

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : कोरोना विषाणू रोखण्यासाठी विविध उपाययोजना करूनही दोंडाईचासह परिसरात दिवसेदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. निष्काळजीपणाने वागणाºया नागरिकामुळे कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरातील नागरिकांनी शहरात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याची मागणी होती. त्यानुसार शनिवारपासून पाच दिवसाचा जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय गुरुवारी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला.
दोंडाईचा नगरपालिकेच्या पटांगणात गुरुवारी झालेल्या अपर तहसीलदार सुदाम महाजन, पालिका प्रभारी मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी, शिंदखेडा तालुका कोविड सेंटरचे प्रमुख डॉ हितेंद्र देशमुख, उप मुख्याधिकारी हर्षल भामरे, पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ संतोष लोले, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ अर्जुन नरोटे यांनी पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला.
आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू असुनही दोंडाईच्यात काही नागरिक, व्यापारी, ग्राहक मास्क वापरतात नाही. फिजिकल डिस्टन्सिंग ठेवत नाही. होम क्वॉरंटाईन असताना नागरिक बिनधास्त फिरतात. नागरिकांमध्ये गांभीर्य नसल्याने कोरोना आटोक्यात येत नाही. या पार्श्वभूमीवर दोंडाईच्या पाच दिवस जनता कर्फ्यू लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. जनतेच्या मागणीनुसार शनिवार ते बुधवार हे पाच दिवस जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे.
पाच दिवसाच्या जनता कर्फ्यूमध्ये कृषी केंद्र, मेडिकल, हॉस्पिटल सुरू राहणार आहेत. परंतु आता आपत्कालीन व्यवस्थापन कायदा न पाळणाºया विरोधात कडक कारवाई, आर्थिक दंड आकारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
दोंडाईचासह परीघातील बाम्हणे, रामी, पथारे, मालपूर, सुराये याठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दोडाईच्यात ६ जून ते १५ जुलै दरम्यान ५४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दोंडाईचा शहरात परिसरातील बाम्हणे, मालपूर, रामी, पथारे, सुराये गावातून दररोज नागरिक बाजारात येत असतात. शहरात आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू असूनही दोंडाईचा शहराती काही नागरिक , व्यापारी, ग्राहक मास्क न वापरता वावरतांना दिसतात. तसेच शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करतांना दिसत नाही. परिणाम कोरोनाचा संसर्ग कमी होण्याऐवजी वाढतो आहे. त्यासाठीच जनता कर्फ्यू लावण्यात आल्याचे अधिकाºयांनी यावेळी सांगितले.

Web Title: Public curfew in Dondai from Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.