अंधश्रद्धा व जादूटोणा प्रतिबंध कायद्याविषयी समाजात जनजागृती होणे आवश्यक अविनाश पाटील : अंधश्रद्धा निर्मूलन आराखड्यावर राज्यस्तरीय वेबिनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:32 IST2021-03-15T04:32:10+5:302021-03-15T04:32:10+5:30

वाईट प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा या समाजाच्या विकासाला मारक ठरत असतात. समाजातील महिला, गरीब आणि श्रीमंत वर्ग देखील अंधश्रद्धेचे जास्त ...

Public awareness on Superstition and Witchcraft Prevention Act Avinash Patil: State Level Webinar on Superstition Eradication Plan | अंधश्रद्धा व जादूटोणा प्रतिबंध कायद्याविषयी समाजात जनजागृती होणे आवश्यक अविनाश पाटील : अंधश्रद्धा निर्मूलन आराखड्यावर राज्यस्तरीय वेबिनार

अंधश्रद्धा व जादूटोणा प्रतिबंध कायद्याविषयी समाजात जनजागृती होणे आवश्यक अविनाश पाटील : अंधश्रद्धा निर्मूलन आराखड्यावर राज्यस्तरीय वेबिनार

वाईट प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा या समाजाच्या विकासाला मारक ठरत असतात. समाजातील महिला, गरीब आणि श्रीमंत वर्ग देखील अंधश्रद्धेचे जास्त वाहक असतात. म्हणून अशा गोष्टींना प्रतिबंध घालण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे. परंतु, केवळ कायदा करून चालणार नाही तर त्याची कठोर अंमलबजावणी होणे आणि समाजमन बदलणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

‘अंनिस’ कायदा व्यवस्थापन विभागाच्या कार्यवाह ॲड. मनीषा महाजन यांनी जादूटोणा कायद्याची माहिती दिली. सहकार्यवाह ॲड. तृप्ती पाटील यांनी जादूटोणा कायद्याच्या अंमलबजावणी स्तरावरील काही उदाहरणे आणि अनुभव सांगितले. अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा कायद्याबाबत नागरिकांची भूमिका या विषयावर बोलताना ‘अंनिस’चे प्रधान सचिव माधव बावगे यांनी कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये नागरिकांनी भोंदूंवर गुन्हा दाखल करणे, काेर्टात केस चालविणे, पुरावे जमा करणे, पीडिताला आधार देणे यासाठी पुढे येण्याची गरज व्यक्त केली.

प्राचार्य अडसुळे यांनी सांगितले की, समाजातील विविध प्रथा, परंपरा समजून घ्याव्यात, कायद्याची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी लोकांची साथ मिळणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

या वेबिनारचे आयोजन व संचालन समन्वयक गोपाळ निंबाळकर यांनी केले तर आभार प्रा. राहुल आहेर यांनी मानले.

Web Title: Public awareness on Superstition and Witchcraft Prevention Act Avinash Patil: State Level Webinar on Superstition Eradication Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.