शेतीच्या वादातून प्रतापपुरला हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 21:48 IST2019-06-07T21:47:52+5:302019-06-07T21:48:14+5:30
परस्पर विरोधी फिर्याद : कुटुंबामधील वाद

शेतीच्या वादातून प्रतापपुरला हाणामारी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : साक्री तालुक्यातील प्रतापपुर गावात दोन कुटुंबामधील वादाने हाणामारीचे स्वरुप प्राप्त झाले़ लाठ्या काठ्याने एकमेकांवर चाल केल्याने परस्पर विरोधी फिर्याद पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली़
एका कुटुंबातील निंबाजी गजमल पाटील (६५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेतीच्या खेडण्याच्या कारणावरुन निंबाजी पाटील यांच्या शेतीवर हक्क दाखवत वंजी गबा गांगुर्डेसह ७ जणांनी हातात लाठ्या काठ्या घेऊन शिवाजी पाटील, त्यांची मुले कैलास, योगेश, भाऊ सुरेश गांगुर्डे यांना बेदम मारहाण करुन जखमी केले़ बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास प्रतापपूर शिवारातील शेतात ही घटना घडली़ याप्रकरणी वंजी गांगुर्डे, राजेंद्र वंजी गांगुर्डे, देविदास गांगुर्डे, दीपक गांगुर्डे, अमोल देविदास गांगुर्डे, अक्षय राजेंद्र गांगुर्डे यांच्या विरोधात भादंवि कलम १४३, १४८, १४९, ३२४, ४४८, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेचा तपास पोलीस कर्मचारी देसले करीत आहेत़
तर राजेंद्र वंजी गांगुर्डे (५२) यांनी फिर्याद नोंदविली आहे़ त्यानुसार, शेती खेडण्याच्या कारणावरुन निंबाजी गांगुर्डे, सुरेश गांगुर्डे, हर्षल सुरेश गांगुर्डे, कैलास निंबा गांगुर्डे, दीपक निंबा गांगुर्डे, भाऊसाहेब बाबुलाल गांगुर्डे, विशाल शिवाजी गांगुर्डे, रोहन राजेंद्र अहिरराव यांनी हातात लाठ्या-काठ्या चाकू घेवून राजेंद्र गांगुर्डे, यांच्या कुटुंबावर हल्ला केला़ घरात घुसून या आरोपींनी राजेंद्र गांगुर्डे, त्यांचे भाऊ आणि पुतण्या यांना हाताबुक्यांनी मारहाण केली़ चाकूने वार केले़ या प्रकरणी आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ हेड कॉन्स्टेबल वाय़ व्ही़ बागुल घटनेचा तपास करीत आहेत़ या घटनेमुळे तणाव निर्माण झाला होता़