धुळे : पांझरा नदीतून वाळू चोरी करुन अवैध वाहतूक करणारे विना नंबरचे डंपर दोन दिवसांपूर्वी धुळे शहर पोलिसांनी पकडले़धुळे शहर अपर तहसिलदारांना सदर डंपर मालकाकडून एक लाख २० हजार ५०० रुपयांचा दंड वसुल केला आहे़पोलिसांनी कळविल्यानंतर तहसिलदारांनी ही कारवाई केल्याने महसूल विभागाचे काम पोलीस करीत असल्याची खोचक चर्चा सुरू आहे़ पांझरा नदी पात्रातून सर्रास वाळू उपसा सुरू असताना महसूल यंत्रणा मात्र दूर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे़
‘महसूल’चे काम करताहेत पोलीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 21:36 IST