शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी जागा पडतेय अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:36 IST

मालपूर येथील अमरावती नदी काठावरील, रामी, खोक्राडे रस्त्यावरील फाट्यावर अमरधाम आहे. मालपूर गाव मोठे असून एकाच वेळी ...

मालपूर येथील अमरावती नदी काठावरील, रामी, खोक्राडे रस्त्यावरील फाट्यावर अमरधाम आहे. मालपूर गाव मोठे असून एकाच वेळी दोन घटना झाल्या तर मृतावर शेवटचा संस्कार करण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून सुमारे ९ लाख १८ हजार खर्चून वाढीव नवीन अमरधामचे नवनिर्माण केले. यात नवीन दहन ओट्याचादेखील समावेश आहे. मात्र हे अमरधाम सध्या अपुरे पडत असून दिवसाला चार ते पाच व्यक्तींवर अंतिम संस्कार करण्याची दुर्दैवी वेळ मालपूरकरांवर आली आहे. अंतिम संस्कार कुठे करावेत, अशी तेथील विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.

मालपूरसह ग्रामीण भागात मृतांवर अंतिम संस्कार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या जागेवर जाऊन पाणी शिंपडून शांत केले जाते व अस्थी गोळा केल्या जातात. विधीवत पूजा केली जाते. दुसऱ्या दिवशी मंगळवार व रविवार येत असेल तर तिसऱ्या दिवशी हा कार्यक्रम होत असतो. तो पर्यंत त्या जागेवर दुसऱ्याचा अंतिमसंस्कार करत नाही. यामुळे जागा अपुरी पडत असून यासाठी आता येथील अमरधामच्या पुढे, पाठीमागील जागेवर जेसीबी यंत्राच्या साहाय्याने ग्रामपंचायत प्रशासनाने पर्यायी जागा तयार करावी.

मालपूर येथील अमरधाममधील आतील भागात सामाजिक संघटनांनी वृक्षारोपण करून संगोपनदेखील केले आहे; मात्र जागाच पुरेशी उरत नसल्यामुळे अंतिमसंस्काराच्या वेळी या वृक्षांना आगीच्या ज्वाळांची झळ पोहचून ही झाडे सुकून जात असल्याचेदेखील दिसून येत असल्यामुळे पर्यायी जागा करणे गरजेचे आहे.

११ एप्रिल रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास एकाच वेळी तेथे दोन मृतदेह दाखल झाल्यामुळे शासनाने घालून दिलेले २० लोकांचे निर्बंध तसेच या अमरधामला वाल कंपाऊंड असल्यामुळे सोशल डिसटन्सिंगचे पालन करणे जिकिरीचे झाले होते.

तसेच येथे हायमास्ट लाईट गाडून तयार आहे. लाख रुपये खर्चून येथे तो पोल उभा केला आहे; मात्र अजून वर्षभरापासून त्या पोलवर वायरअभावी दिवा, लाईट चमकू शकला नसल्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता तरी सध्या ची परिस्थिती बघता ग्रामपंचायत प्रशासनाने येथे त्वरित विजेची सोय करावी. कारण मृतावर रात्री-अपरात्री अंतिम संस्कार करावे लागत असल्यामुळे मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या कामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी बॅनर, पाॅम्प्लेटवर फोटो असणाऱ्या पॅनल प्रमुखांनी लक्ष घालावे, अशीदेखील मालपूरकर ग्रामस्थांची मागणी आहे.

प्रतिक्रिया.......

अमरधाम येथे हायमास्ट उभा आहे; मात्र वर्षभरापासून चमकू शकला नाही ही ग्रामपंचायत प्रशासनाची शोकांतिका म्हणावी लागेल. अमरधाम येथे मृतावर अंत्यसंस्कार करायला जागा अपुरी पडत असून युवा नेते, प्रेरणास्थान, पॅनल प्रमुख कुठे गायब झाले आहेत, दिसत नाही. सध्या तुमची गावाला गरज असून रस्त्यावर उतरून गावकऱ्यांना मदत करा.

प्रफुल्ल खंडेराव

मालपूर ग्रामस्थ