मूलभूत प्रश्न न सोडविल्यास जनआंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 01:28 PM2019-11-16T13:28:48+5:302019-11-16T13:29:32+5:30

नागरिकांचा इशारा : हद्दवाढ झालेल्या प्रभाग एक मध्ये समस्यांचा विळखा

People's agitation without solving the basic questions | मूलभूत प्रश्न न सोडविल्यास जनआंदोलन

Dhule

Next

धुळे : महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेली १० गावे मूलभूत सोयी-सुविधांपासून अद्याप वंचित आहेत़ अनेकवेळा पाठपुरावा करून देखील प्रश्न सुटत नसल्याने मनपा प्रशासनाविरोधात जनआंदोलन उभारण्याचा इशारा प्रभाग एक मधील नागरिकांनी दिला आहे़
आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले जात आहे़ मात्र प्रभाग एक मधील इंदिरानगर, परभणी वाडा, लक्ष्मी चौक, भिलाटी, देवमाडी परिसरात तब्बल १५ दिवसातून एक वेळा पाणीपुरवठा केला जातो़ त्यामुळे नागरिकांना घरात पाणी साठवून ठेवावे लागते. परिसरात डेंग्यूने थैमान घातले आहे़ वलवाडी भागात जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असल्याने रस्ते खोदण्यात आले आहे़ त्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नाही़ तर सांडपाणी रस्त्यावर साचत असल्याने परिसरात डासांचा प्रार्दुभाव झाला आहे़ येथील जलवाहिनी नाल्यातून टाकलेली असल्याने सतत फुटते त्यामुळे गटारीचे सांडपाणी जलवाहिनीव्दारे नागरिकांना पिण्यासाठी मिळते़ त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़

Web Title: People's agitation without solving the basic questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे