शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST

मुलचेरा शिवसेना तालुका शाखेच्या वतीने सोमवारी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना शेतकºयांना करावा लागत आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : शिवसेनेतर्फे मुलचेरा तहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या अवकाळी पावसामुळे हाती आलेले पीक नष्ट झाले. वादळी पावसामुळे शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकºयांना त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.मुलचेरा शिवसेना तालुका शाखेच्या वतीने सोमवारी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना शेतकºयांना करावा लागत आहे. अनेक शेतकरी सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना न्याय देणे आवश्यक आहे. प्रशासनाने सदर लाभार्थ्यांची नावे यादीत टाकून सन्मान योजनेचा लाभ द्यावा, केंद्र शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत निम्मी खर्च झाली नाही. त्यामुळे शिल्लक असलेला निधी शेतकऱ्यांना द्यावा. तसेच रोजगार हमी योजनेंतर्गत कामे सुरू करून त्वरित शेतकऱ्यांच्या हाताला काम द्यावे, कामे सुरू केल्यास रोजगारासाठी बाहेर स्थलांतर होणार नाही. अतिवृष्टीमुळे तसेच विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे बराचसा पैसा उपाययोजना करण्यात गेला. त्यामुळे सध्या रबी हंगामासाठी बी-बियाणे व खते खरेदी करण्याकरिता शेतकऱ्यांकडे पैसे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला काम द्यावे तसेच योग्य उपाययोजना कराव्या, पीक विम्याचे पैसे सरसकट शेतकऱ्यांना द्यावे, संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्यात यावा, तसेच हेक्टरी मदत न देता प्रति एकरी मदत द्यावी, तसेच शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांच्या स्थितीचा विचार करून त्वरित उपाययोजना प्रशासनस्तरावरून कराव्या, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश होता.निवेदन देताना तालुका प्रमुख नीलकमल मंडल, शहर प्रमुख दिगंबर गावडे व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.धानोरा तहसील कार्यालयावर शिवसैनिकांची धडकशिवसेना तालुका शाखा धानोराच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर धडक देऊन जिल्हाधिकाºयांच्या नावे २५ आॅक्टोबर रोजी सोमवारला निवेदन देण्यात आले. संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्यात यावा, विमा कंपन्यांनी विम्याची रक्कम शेतकºयांना त्वरित द्यावी, व्यापारी, सावकारी कर्ज माफ करावे, कृषिपंपाचे वीज बिल माफ करावे, शेतकऱ्यांच्या मुलाची फी माफ करावी, बँकांनी कर्जमाफी होईपर्यंत कर्ज वसुली थांबविण्यात यावी, विद्यार्थी व विद्यार्थिनींना त्यांच्या शाळेपर्यंतच्या प्रवासाची सुविधा मोफत करण्यात यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. सदर निवेदन तहसीलदार के.वाय.कुनारपवार यांनी स्वीकारले. यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोद्दार, सुनील पोरेड्डीवार, शिवसेना तालुका प्रमुख चंद्रशेखर उईके, नंदू कुमरे, वासुदेव शेडमाके, मुकेश बोडगेवार, नकूल बोरीकर, उमेश वड्डे, अनिकेत फलके, पुरूषोत्तम चिंचोलकर, प्रेम उंदीरवाडे, माहिन शेख, शोहेब शेख, प्रवीण बोडगेवार, देवराव मोगरकर, तुळशिदास कुकुडकर, प्रशांत धुडसे, विनोेद मेश्राम हजर होते.

टॅग्स :Socialसामाजिक