संस्कार विसरण्याएवढं आई-वडीलांनी शिकवू नये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 12:39 PM2020-03-01T12:39:44+5:302020-03-01T12:40:51+5:30

चंद्रकांत सोनार । लोकमत न्यूज नेटवर्क आपल्या मुलाने डॉक्टर, वकील, इंजिनिअर, प्राध्यापक अशा उच्च पदावर जावून लाखो रूपयांची नोकरी ...

Parents should not be taught to forget rites! | संस्कार विसरण्याएवढं आई-वडीलांनी शिकवू नये!

dhule

googlenewsNext
ठळक मुद्देउच्चशिक्षित समाज अपयशीआई-बापापेक्षा पैसा सर्वात श्रेष्ठ

चंद्रकांत सोनार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आपल्या मुलाने डॉक्टर, वकील, इंजिनिअर, प्राध्यापक अशा उच्च पदावर जावून लाखो रूपयांची नोकरी करावी, यासाठी आयुष्यभर अहोरात्र काबाड कष्ट करून रक्ताचे पाणी करणाऱ्या आई-वडीलांना म्हातारपणी अनाथ होऊन वृध्दाश्रमात जीवन जगण्याची वेळ येते़ यासाठी आई-वडीलांनी मुलांना उच्चशिक्षित करा, मात्र ते करीत असतांना ते संस्कार विसणार नाहीत याचीही काळजी घ्यावी असे मत आनंद विहार ृवृध्दाश्रमाचे अध्यक्ष शशिकांत भदाणे यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना सांगितले़
प्रश्न : सर्वकाही असतांना कशामुळे वृध्दश्रमात येण्याची वेळ येते़
उत्तर : मुलगा उतारवयाची काठी असतो आणि मुलगी परक्याचं धन असते, अशी समजूत असते़ त्यामुळे शासकीय पदावर असलेल्या आई-वडीलांचा देखील उतारवयात मुलांकडून सांभाळ होत नाही़ ही समाजातील दुर्दवीबाब आहे़ आई-वडीलांना मुलांना उच्चशिक्षित जरूर करा, मात्र आपले संस्कार विसणार नाहीत याचीही जाणीव ठेवा़
प्रश्न : वृध्दावर अन्याय होणार नाही, यासाठी काय प्रयत्न केले जातात?
उत्तर : वृध्दाश्रमात आतापर्यत २५० ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ वृध्दाश्रमात झाला आहे़ सध्या दहा निराधार आहेत़ आई-वडील मुलासाठी कोट्यावधीची मालमत्ता जमवितात़ पैशावरून शेवटी वाद होतात़ मुलगा, सुना नोकरी करतात़ त्यामुळे वृध्दांधा सांभाळणारे कोणी नसल्याने अखेर निराधार होण्याची वेळ येते़
प्रश्न : आतापर्यत तुम्ही किती वृध्दांवर अंत्यसंस्कार केले?
उत्तर : एकुलता एक अभियंत्या मुलगाकडून आई-वडीलांचा सांभाळ झाला नाही़ त्यांने धुळे बसस्थानकावर आई-वडीलांना बसवुन न सांगता मुंबईला निघून गेला़ त्यांचा सांभाळ आम्ही केला़ वडीलांचा मृत्यूनंतर मुलाला फोन केला़ मात्र त्यांने नकार दिला़ त्यामुळे मी स्व:ता त्यांना अन्निडाग दिला़ त्यांची मुलगी रात्री उशिरा आली़ आईला मी सांभाळेल असे सांगून आईला सोबत घेऊन गेली़
आई-बापापेक्षा पैसा सर्वात श्रेष्ठ
आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर जे घर आई-वडीलासांठी सुरक्षित वाटायचे़ तेच घर कालातंराने असुरक्षित वाटायला लागते़ आपली काळजी घेणारे मुलांसाठी आई-वडील केवळ पैसा कमावण्याचे माध्यम होते़ याची जेव्हा जाणीव होते़ तेव्हा मुलांचा खरा स्वभाव आई-वडीलांच्या लक्षात येतो़ आई-वडीलांचा सांभाळ न करणाºया मुलांनी कधी एकदा तरी विचार करावा की, आपन ही कधी आई-वडील होऊ़
उच्चशिक्षित समाज अपयशी
रक्ताचे पाणी करून मुलांना डॉक्टर, वकील, अभियंता, प्राध्यापक तसेच शासकीय अधिकारी पदापर्यत नेणाºया आई-वडीलांचा महत्वाचा वाटा असतो़ मात्र त्यांच उच्चशिक्षित मुलांकडून आई-वडीलांचा सांभाळ करण्यासाठी उतारवयात वेळ देता येत नाही़ जेव्हा त्यांना तुमची गरज आहे़ अशा वेळी तुम्ही त्यांना साथ द्या, यापैक्षा काही श्रेष्ठ नाही़

Web Title: Parents should not be taught to forget rites!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे