Parents fascinated by the art of chiming | चिमुकल्यांच्या कलाविष्काराने पालक मंत्रमुग्ध
Dhule

धुळे : येथील सिस्टेल टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्लिश मिडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन कर्मवीर भाऊराव हिरे नाट्यगृहात जल्लोषात पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर करुन उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळविली.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महापालिकेचे उपायुक्त गणेश गिरी, जि.प. शिक्षणाधिकारी मनिष पवार उपस्थित होते. यावेळी चेअरमन हेमंत घरटे, सचिव हंसराज पाटील, प्रशासकीय अधिकारी सुवर्णा घरटे, मुख्याध्यापक गिरीष बाबू व्यासपीठावर उपस्थित होते.
दीप प्रज्वलन व प्रतिमापुजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. मान्यवरांचा स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वागत नृत्य सादर केले. तसेच मंगळागौर, आदिवासी नृत्य, पारंपारिक सण उत्सव आदी विषयांसह विविध कलाविष्काराचे कार्यक्रम सादर करुन उत्स्फूर्त दाद पटकाविली.
याप्रसंगी शैक्षणिक वर्षात अभ्यास, कला व क्रीडा क्षेत्रात विशेष नैपुण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना स्मृतचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता लुंड, अंकिता मेहता, विणा देसले, आदित्य आत्राम यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Parents fascinated by the art of chiming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.