शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

धुळे जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 11:58 AM

नदी-नाल्यांना पूर, साक्री तालुक्यातील २ धरणे ‘ओव्हरफ्लो’

ठळक मुद्देजिल्ह्यात २२ दिवसांच्या खंडानंतर सर्वदूर जोरदार पाऊस दोन धरणे ‘ओव्हरफ्लो’, कान, बुराई नद्यांसह नाल्यांना पूर खरीप पिकांना जीवदान, रब्बीलाही होणार फायदा 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यात गुरुवारी सर्वदूर जोरदार पाऊस झाला. संध्याकाळनंतर पावसाचा जोर वाढला. रात्री तो उत्तरोत्तर वाढत गेला. यामुळे शेतीची तहान भागली असून पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे साक्री तालुक्यातील पांझरा (लाटीपाडा), जामखेडी ही दोन्ही मोठी धरणे ‘ओव्हरफ्लो’ झाली. तर जिल्ह्यातील अन्य नदी-नाल्यांनाही पूर आले आहेत. दरम्यान शिंदखेडा तालुक्यात रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे नाल्यास आलेल्या पुरामुळे बैलगाडी वाहून गेली. दोघा बैलांचा मृत्यू झाला असून गाडी वाहून गेल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे सांगण्यात आले. साक्री तालुक्यात वार्सा, उमरपाटा, दहीवेल आदी ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सलग दुस-या दिवशी सूर्यदर्शन झाले नाही. जिल्ह्यात तब्बल २२ दिवसांच्या खंडानंतर पावसाचे आगमन झाले. गुरूवारी पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरूवात झाल्याने दिवसभर सूर्यदर्शनही झाले नाही. दिवसभर रिमझिम पावसाची रिपरिप सुरू होती. संध्याकाळनंतर मात्र पावसाचा जोर वाढला. धुळे, शिरपूर, शिंदखेडा व साक्री तालुक्यात सर्वदूर जोरदार पाऊस सुरू झाला. यामुळे बहुतांश गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. धुळे शहरातही बहुतांश भाग अंधारात बुडाला होता. काही ठिकाणी रात्री वीजपुरवठा सुरू झाला. तर ब-याच ठिकाणी रात्रभर तो खंडीत राहिला. साक्री तालुक्यातील कान, बुराई या नद्यांना रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठा पूर आला आहे. या शिवाय अनेक नाल्यांनाही पूर आला. शिंदखेडा तालुक्यात नाला ओलांडताना अचानक आलेल्या पुरामुळे बैलगाडी वाहून गेली. पुरात बुडून दोन्ही बैलांचा मृत्यू झाला. तर गाडी पुरात वाहून गेल्याचे सांगण्यात आले. या पावसामुळे सर्व खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र मूग, उडीद ही पिके पावसाच्या मोठ्या खंडामुळे वाया गेली आहेत. कपाशीला या पावसाचा जास्त फायदा होणार असून मका, ज्वारी व बाजरी यांच्या उत्पादनात मात्र घट होणार आहे. रब्बी हंगामासाठी मात्र या पावसाचा फायदा होईल, असे कृषीतज्ञांचे मत आहे. ज्या भागात अतिवृष्टी झाली तेथील कांद्याचे पीक वाहून गेल्याने नुकसान झाल्याचे वृत्त आहे. 

 

टॅग्स :DhuleधुळेRainपाऊस