धर्मनाथ बीज महोत्सवानिमित्त नवनाथ भक्तीसार ग्रंथ पारायण सप्ताहांतर्गत पहाटे ५ वाजता काकड आरती, सकाळी ९ ते १२ ग्रंथ पारायण, दुपारी ३ ते ६ ग्रंथ विवेचन, सायंकाळी ६ ते ८ हरिपाठ व रात्री ८.३० ते ९.३० या कालावधीत हभप अमोल महाराज, हभप भूषण महाराज, हभप भगवान महाराज, हभप प्रमोद महाराज, हभप ईश्वर महाराज, हभप विनोद महाराज, हभप आनंदमूर्ती बाबाजी महाराज, हभप आकाश महाराज यांचे प्रवचन होणार आहे. १२ फेब्रुवारी रोजी रात्री ९ ते ११ हभप तुकाराम महाराज यांचे कीर्तन, तर १३ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजता महारूद्राभिषेक व महाआरती, सकाळी ९ वाजता हभप जयेश महाराज यांचे प्रवचन, दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप तसेच पारायणाला बसणाऱ्या भाविकांना नवनाथ भक्तीसार ग्रंथ भेट देण्यात येणार आहे.
नावरा-नावरी येथे धर्मनाथ बीज महोत्सवाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:45 IST