स्वयंसेवी संस्थांना रोजगार हमी योजनेत काम करण्याची संधी जिल्हाधिकारी यांचे आवाहन : अर्ज सादर करण्यासाठी २५ एप्रिलपर्यंत मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:35 AM2021-04-17T04:35:52+5:302021-04-17T04:35:52+5:30

राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडील परिपत्रकान्वये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे मृद व जलसंधारण, वृक्षसंगोपन, सांडपाणी व ...

Opportunity for NGOs to work in Employment Guarantee Scheme Collector's Appeal: Deadline for submission of applications till 25th April | स्वयंसेवी संस्थांना रोजगार हमी योजनेत काम करण्याची संधी जिल्हाधिकारी यांचे आवाहन : अर्ज सादर करण्यासाठी २५ एप्रिलपर्यंत मुदत

स्वयंसेवी संस्थांना रोजगार हमी योजनेत काम करण्याची संधी जिल्हाधिकारी यांचे आवाहन : अर्ज सादर करण्यासाठी २५ एप्रिलपर्यंत मुदत

Next

राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडील परिपत्रकान्वये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे मृद व जलसंधारण, वृक्षसंगोपन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तिक लाभाच्या योजना व अभिसरण व मूलभूत सुविधांचा विकासाअंतर्गत कामे केली जातात. योजनेच्या कामाची अंमलबजावणी करताना अशासकीय संस्थांची व इतर सेवाभावी संस्थांची मदत घेतल्यास योजना प्रभावीपणे राबवून लोकांचे जीवनमान उंचावणे शक्य होईल. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये अखर्चिक भागीदारीकरिता स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्याआनुषंगाने कार्यपध्दती निश्चित केली आहे. निकष पूर्ण करणाऱ्या संस्थांनी अर्ज सादर करावेत.

स्वयंसेवी स्ंस्था निवडीचे निकष असे : स्वयंसेवी संस्था निती आयोगाच्या अंतर्गत नोंदणीकृत असावी. विनाआर्थिकसाहाय्याचे काम करण्याची तयारी असावी. शासकीय क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असावा. जलसंधारण किंवा सामुदायिक विकासाचे नियोजन क्षेत्रात काम करणाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य राहील. स्वयंसेवी संस्थाचे प्रशासकीय संघटन जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात असावे. स्वयंसेवी संस्थांची जिल्हा व तालुकास्तरावर प्रशिक्षण, संवाद, श्रमदान, नियोजनात सहयोग, सामाजिक अंकेक्षण व गुणवत्ता, मोजमापच्या कामात सहकार्य करण्याची तयारी असावी. यासाठी अर्ज सादर करावेत. जिल्ह्यातील कार्यरत स्वयंसेवी संस्थांनी मग्रा रोहयोअंतर्गत सहभाग होण्यासाठी २५ एप्रिलपर्यंत आवश्यक त्या कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

Web Title: Opportunity for NGOs to work in Employment Guarantee Scheme Collector's Appeal: Deadline for submission of applications till 25th April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.