शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक येथून कांदा व्यापाऱ्याला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 22:27 IST

पिंपळनेर : सुनावली पोलीस कोठडी

पिंपळनेर: कांदा विक्रीचे पैसे शेतकऱ्यांना व्यापाऱ्याकडून न मिळाल्याने अखेर संबंधित व्यापाºयाला पोलिसांनी अटक केली़ त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली़गेल्या नऊ ते दहा महिन्यांपूर्वी शेतकºयांनी मार्केटमध्ये बिजासनी कंपनीचे मालक व्यापारी दीपक सोनू पाटील यांना कांदा विक्री केला होता़ या शेतकऱ्यांना अद्यापही पैसे न मिळाल्याने शेतकºयांनी आंदोलन केले होते़ व्यापारी पैसे देत नसल्याने शेतकऱ्यांनी मार्केट कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता़ त्यावेळी संतप्त शेतकरी व शाखाप्रमुख पोलीस ठाण्यात व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते़ गुन्हा दाखलवेळी त्यावेळेचे अधिकारी यांनी टाळाटाळ केली होती़यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रस्ते आस्थापना विभागाचे जिल्हाध्यक्ष धीरज देसले यांनी त्यावेळचे नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते़ त्यानंतर दोरजे यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांना दूरध्वनीवर निर्देश दिल्यानंतर संबंधित तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांनी संजय बावा यांची फिर्याद घेतली होती.शेतकºयांना न्याय मिळत नसल्याने संबंधित अन्यायकारक शेतकºयांनी नाशिक येथे जाऊन विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांची भेट घेतली व घडलेला सर्व प्रकार यावेळी सांगण्यात आल्याचे शेतकºयांनी सांगितले़ तसेच साक्री येथे प्रताप दिघावकर आले असता यावेळी देखील या शेतकºयांनी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते़ घटनेचा तपास यानंतर अधिक वेगाने झाल्याने पोलिसांनी सापळा रचून नाशिक येथून गोपनीय माहितीच्या आधारे कित्येक दिवसापासून मिळून न येणारा कांदा व्यापारी दीपक सोनू पाटील याला अटक केली़ संबंधित व्यापाऱ्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली़ पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे तपास करीत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे