धुळ्यानजिक महामार्गावर ट्रकच्या धडकेत एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 11:56 IST2020-01-23T11:56:08+5:302020-01-23T11:56:27+5:30

कुंडाणे फाटा : गतिरोधकाच्या मागणीसाठी ग्रामस्थ एकवटले

One killed in truck collision on highway near Dhule | धुळ्यानजिक महामार्गावर ट्रकच्या धडकेत एक ठार

धुळ्यानजिक महामार्गावर ट्रकच्या धडकेत एक ठार

धुळे : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळ्यानजिक कुंडाणे फाट्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली़ यात धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील राजेंद्र बन्सीलाल भावसार (५२) यांचा जागीच मृत्यू झाला़ अपघाताची ही घटना गुरुवारी सकाळी घडली़ भावसार हे एमआयडीसी येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात़ कामावरुन घरी परत येत असताना अपघाताची ही दुर्घटना घडली़
शेतात अतिवृष्टीमुळे आर्थिक उत्पन्न आले नव्हते़ परिणामी घराचा संसार उभा करण्यासाठी ते एमआयडीसी येथे सुरक्षा रक्षक म्हणून कामास जात होते़ या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला़ त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत़ ग्रामस्थांनी एकत्र येऊन महामार्गावर गतिरोधकाच्या मागणीसाठी काही काळ रास्ता रोको आंदोलन छेडले होते़ परिणामी अपघातानंतर वाहतूक विस्कळीत झाली होती़ महामार्गाच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ पोलिसांनी घटनास्थळी येऊन ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली़ दरम्यान, कुंडाणे फाट्यावर नेहमी अपघात होत असतात़

Web Title: One killed in truck collision on highway near Dhule