सुरपानला एकाचा खून, चार ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 11:57 IST2019-06-20T11:57:18+5:302019-06-20T11:57:47+5:30

किरकोळ कारण : गावातील घटनेमुळे चर्चेला उधाण

One killed in surapan, four possessed | सुरपानला एकाचा खून, चार ताब्यात

सुरपानला एकाचा खून, चार ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
साक्री : रात्रीची वेळ असून आरडा-ओरड करु नका, असे सांगितल्याचा राग आल्याने चौघांनी रतिलाल विश्राम सोनवणे (५८) यांच्यासह त्यांच्या मुलाला बेदम मारहाण केली़ या मारहाणीत रतिलाल सोनवणे यांचा मृत्यू झाला़ तर गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़  खूनाची ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली़ या घटनेमुळे सुरपान गाव सुन्न झाले आहे़ गावात याच विषयाची चर्चा आहे़ घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते़ मारहाण करणाºयांची धरपकड करण्यात आली असून चार जणांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले आहे़ पुढील तपास सुरु आहे़ 

Web Title: One killed in surapan, four possessed