शिंदखेडा तालुक्यात १ लाख हेक्टरवर खरीप पेरणीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:25 IST2021-06-03T04:25:43+5:302021-06-03T04:25:43+5:30

कोरोनाचे संकट असतानाही बळीराजाने शेतीची मशागत केली आहे. २५ मे रोजी पावसाचा रोहिणी नक्षत्रास सुरुवात झाली. ८ जूनपासून ...

Objective of kharif sowing on 1 lakh hectare in Shindkheda taluka | शिंदखेडा तालुक्यात १ लाख हेक्टरवर खरीप पेरणीचे उद्दिष्ट

शिंदखेडा तालुक्यात १ लाख हेक्टरवर खरीप पेरणीचे उद्दिष्ट

कोरोनाचे संकट असतानाही बळीराजाने शेतीची मशागत केली आहे. २५ मे रोजी पावसाचा रोहिणी नक्षत्रास सुरुवात झाली. ८ जूनपासून मृग सुरू होणार आहे. कोरोनाचा महामारीतही बळीराजा मोठ्या उमेदीने खरीप पेरणीस सामोरा जात आहे. खरीपपूर्व मशागत अंतिम टप्प्यात असून खते, बियाणे खरेदीचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी खरीप कर्ज, सोने तारण कर्ज मिळविण्यासाठी बँकेत शेतकरी चकरा मारीत आहे. बँकांनी तात्काळ शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.

शिंदखेडा तालुक्यात २०२१-२२ या आर्थिक वर्षात विविध पिकांच्या पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.

तृणधान्य-ज्वारी १ हजार ४००, बाजरी ११ हजार १८०, मका ८ हजार ५३८ हेक्टर असे एकूण २१ हजार ११८ हेक्टर तृणधान्य पेरणीची शक्यता आहे. कडधान्य-तूर ७५५, मूग ५ हजार ८१०, उडीद ७५५, इतर कडधान्य १०० हेक्टर असे एकूण ७ हजार ४२० हेक्टर कडधान्य पेरणीची शक्यता आहे. गळीत धान्य-भुईमूग १ हजार ४०२, तीळ १०५, सोयाबीन ५० असे १ हजार ५५७ हेक्टर गळीत धान्य पेरणीची शक्यता आहे. यावर्षी २५० हेक्टरवर उसाची लागवड होणार आहे.

दरम्यान, यावर्षी कापसाची लागवड जादा होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी ५६ हजार ९०० हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. या खरीप हंगामात ७० हजार ७३५ हेक्टर म्हणजे २० हजार ८३५ हेक्टर जादा लागवड होण्याची शक्यता आहे.

कृषी विभागाने खरीप पिकांचे नियोजन केले आहे. कापसाच्या ७० हजार ७३५ हेक्टर क्षेत्रासाठी बीटी वाणाची ३ लाख ५५ हजार

पाकिटे उपलब्ध आहेत.

Web Title: Objective of kharif sowing on 1 lakh hectare in Shindkheda taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.