काेरोना लसीकरणात डाॅक्टरांसह नर्स कर्मचाऱ्यांनी घेतला पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:38 IST2021-02-09T04:38:59+5:302021-02-09T04:38:59+5:30
कोरोना महामारीमुळे देशात थैमान घातले होते. त्यामुळे या संसर्गजन्य आजारावर लस केव्हा येईल. याची सर्वांना प्रतिक्षा लागून होती. मोठ्या ...

काेरोना लसीकरणात डाॅक्टरांसह नर्स कर्मचाऱ्यांनी घेतला पुढाकार
कोरोना महामारीमुळे देशात थैमान घातले होते. त्यामुळे या संसर्गजन्य आजारावर लस केव्हा येईल. याची सर्वांना प्रतिक्षा लागून होती. मोठ्या प्रतिक्षेनंतर पहिली स्वदेशी लस बनविण्यात भारताला यश मिळविता आहे. कोरोना काळात रूग्णसेवा करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना १६ जानेवारीपासून लसीकरण केले जात आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला १२ हजार ४३० लसी उपलब्ध झाल्या होत्या. त्यात सर्वाधिक लसीकरण केल्याने राज्यात धुुळे जिल्हाने प्रथम क्रमांक पटकविला आहे. दरम्यान १ फेब्रुवारीपासून दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वाॅरियर म्हणजेच पोलिस, अग्निशमन यंत्रणा, वीज कंपनीचे कर्मचारी, मनपा अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी, महसूल अधिकारी व कर्मचारऱ्यांना लसीकरण केले जात आहे.
कोरोना लसीकरणाबाबत समाजात आजही गैरसमज आहे. त्यामुळे डाॅक्टरांकडून लसीकरणास नकार दिला जात आहे. असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
काही तरून म्हणतात की लसीकरण केल्यास वैधत्व निर्माण होईल किंवा रोग प्रतिकार शक्ती खालावेल अशी धारणा आहे. त्यामुळे बहूतांश तरूणांकडून लस घेण्यास नकार दिला जात आहे
प्रशासनाकडून लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आलेली असतांना काही आपल्यात रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे. त्यामुळे उगाच लस घेऊन शकला ताण वाढवायचा म्हणून काहींनी लस घेण्यास पाठ फिरवली आहे.