एनआरसी कायद्या रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 14:14 IST2020-01-13T13:58:29+5:302020-01-13T14:14:58+5:30
बहूजन क्रांती मोर्चा संघटनेतर्फे मोर्चा

Dhule
धुळे : केंद्र सरकारने पारीत केलेला एनआरसी व सीएए कायदा हा अन्याय करणारा आहे़ त्यामुळे अनेकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे़ हा कायदा त्वरीत रद्द करण्यात यावा, यामागणीसाठी सोमवारी बहूजन क्रांती मोर्चा संघटनेतर्फे मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले़
मालेगाव रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून पाच कंदील, फुलवाला चौक, जुन्या महापालिका इमारत मार्ग क्युमाईन क्लब येथे मोर्चाचा समारोप करण्यात आला़ संघटनेचे प्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाला विविध मागण्याचे निवेदन दिले़ यावेळी दिलीप पाटील, कैलास माळी, रतन वाघख कमलाकर सौदानकर, संजय सोनवणे, विशाल साळवे, अॅड़ उमाकांत घोडराज आदी उपस्थित होते़