नव्याने होणारी कृषी विद्यापीठ हे चार जिल्ह्यांसाठी होणार असून त्यात धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक शहराचा समावेश आहे. धुळ्यात कृषी विद्यापीठ झाल्यास शेती सोबतच शेतकरी, शेतमजूूर, कामगारांसह सर्व सामान्य नागरिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. विद्यापीठासाठी कृषी महाविद्यालयाकडे पुरेसा स्टाफ, लायब्ररी, नर्सरी, प्रयोगशाळा, वेधशाळा, इमारत, कार्यालये, संशोधन केंद्र, लेडिज हाॅस्टेल, जेन्स हाॅस्टेल व अन्य सुविधा आहेत. तसेच संशोधनासाठी परिसरात जागा उपलब्ध होऊ शकते. येथील कृषी महाविद्यालय राज्यातील मध्यवर्ती ठिकाणावर आहे. त्यामुळे राज्यासह अन्य राज्यात दळण वळण सोपे होऊ शकते. धुळ्यासह नंदुरबार, जळगाव, मालेगाव तसेच नशिक येथील विद्यार्थांना जवळचे ठिकाण असल्याने तातडीने हा विषय सोडवून धुळ्यालाच कृषी विद्यापीठ स्थापन करावे, अशा मागणीचे निवेदन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना युवा सेनाधिकारी गाेरे, यांनी दिले. यावेळी आमदार मंजुळ गावीत, जिल्हा प्रमुख हिलाल माळी, ग्रामीण जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे, धुळे शहर संपर्क प्रमुख अतुल साेनवणे आदी उपस्थित होते.
धुळ्यातच नवीन कृषी विद्यापीठ करावे, युवा सेनेचे पालकमंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:34 IST