समरसतेची व्याप्ती समजून घेण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 21:59 IST2020-01-12T21:59:18+5:302020-01-12T21:59:38+5:30
रमेश पांडव : सामाजिक समरसतेवर व्याख्यान

समरसतेची व्याप्ती समजून घेण्याची गरज
धुळे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात सामाजिक समरसतेची मुहुर्तमेढ खऱ्या अर्थाने रोवली गेली़ सामाजिक समरसतेची व्याप्ती खूपच मोठी असून ती समजून घेण्याची गरज आहे़ असे विचार औरंगाबाद येथील सामाजिक समरसतेचे अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य प्रा़ डॉ़ रमेश पांडव यांनी व्यक्त केले़
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धुळे शाखेतर्फे छत्रपती राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरात ‘छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक समरसता’ या विषयावर प्रा़ डॉ़ रमेश पांडव बोलत होते़ यावेळी जिल्हा संघचालक संजय चौधरी, शहर संघचालक डॉ़ पंकज देवरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते़
प्रा़ डॉ़ पांडव म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात अनेकांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले़ अनेकांनी प्रबोधन केले़ संघर्ष करुन आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे़ एकमेकांचे सुख-दु:ख समजून घ्यायला हवे़ छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज विकासासाठी दिलेले योगदान खरोखरच वाखाणण्याजोगी आहे़