शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

देशाला सावरकरांच्या विचारांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 22:56 IST

संमेलनाध्यक्ष दिलीप करंबेळकर : धुळ्यात दोन दिवसीय स्वा.सावरकर साहित्य संमेलनास थाटात सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे (भाषाप्रभू कै. पु.भा.भावे साहित्यनगरी): भारताला जगापुढे आदर्श म्हणून उभे करायचे असेल तर सावरकरांनी सांगितलेल्या विज्ञानवाद, राष्टÑवाद या कृतीशिल विचारांची गरज आहे. समाजातील तळागाळात ज्ञानसंस्कृती रूजायची असेल तर जगातील अधिकाधिक ज्ञान स्वभाषेत आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष तथा महाराष्टÑ राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी आज येथे केले.महाराष्टÑ राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, सावरकर दर्शन प्रतिष्ठान मुंबई आणि धुळे एज्युकेशन सोसायटी धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनात ते अध्यक्षपदावरून बोलत होते.मुंबई-आग्रा रोडवर गुरूद्वारासमोर असलेल्या कान्हा रिजेन्सी येथे हे साहित्य संमेलन सुरू आहे.संमेलनस्थळाला प्रतिभासंपन्न लेखक पु.भा.भावे यांचे नाव देण्यात आले आहे.व्यासपीठावर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, भाजपाचे राष्टÑीय उपाध्यक्ष खा.डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, स्वातंत्र्यवीर सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे अध्यक्ष भिकू इदाते, सरचिटणीस रवींद्र साठे, देवगिरी प्रांत संचालक मधुकर जाधव, महापौर चंद्रकांत सोनार, संमेलनाचे स्वागताध्यक्ष रवी बेलपाठक, उपाध्यक्ष सुभाष अग्रवाल, सचिव हर्षल विभांडीक होते.दीपप्रज्वलन व सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाला सुरूवात झाली.दिलीप करंबेळकर म्हणाले, आठशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून संस्कृतमध्ये लिहिलेल्या तत्वज्ञानाचा बहुजनांना समजेल अशा भाषेत परियच करून दिला. आता विज्ञानेश्वरीच्या रूपाने तसाच परिचय करून देण्याची आवश्यकता आहे. ज्ञानाची उपासना करणारा वर्ग व प्रत्यक्ष कामात त्याचा उपयोग करणारा वर्ग यांची झालेली फारकत, हे भारताच्या अवनतीचे एक कारण आहे. आधुनिक वैज्ञानिक संस्कृतीपासून वंचीत राहिल्याने, समाजातील मोठ्या गटाचे भावविश्व विस्तारू शकत नाही. ते जोपर्यंत विस्तारणार नाही, तोपर्यंत भारताच्या विकास प्रक्रियेचा तो अंगभूत घटक बनू शकत नाही. एकविसाव्या शतकातील भाविविश्वाशी लोकांना जोडायचे आहे.सावरकरप्रणित राष्टÑवाद हा गुणात्मकरित्या इतर राष्टÑाहून वेगळा होता. सावरकरांच्या सामर्थ्यशील हिंदू राष्टÑ संकल्पनेवर आक्रमक राष्टÑवाद म्हणून टीका करण्यात आली. सावरकरांनी स्वातंत्र्य स्तोत्र लिहिले तेव्हा भारत पारतंत्र्यात होता. भारत स्वतंत्र झाला तेव्हा सावरकरांना राजकीय उपेक्षा सहन करावी लागली. त्यामुळे त्यांनी समर्थ भारताच्या धरलेल्या आग्रहाचा विचार सकारात्मकदृट्या करण्याऐवजी उपहास केला गेला असेही ते म्हणाले.एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञानाने जग जवळ आले आहे. परंतु ते अधिक संघर्षमय झाले आहे. कारण अजुनही सर्व जगाला एकत्र आणेल असे मिथक तयार झालेले नाही.सर्व जगाला त्याच्या बहुविधतेची वैशिट्ये जपत सर्जनशिलतेला जपणारे मिथकच एकत्र आणू शकणार आहे.आपल्या देशासमोरील प्रश्न सोडविण्यासाठी व सावरकरांच्या स्वप्नातील भारत प्रत्यक्षात आणण्यासाठी काय करायचे याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी जातवादावर आधारित संघर्षाचे निर्मूलन, धार्मिक साम्राज्यवादी प्रवृत्तींना आवर, राष्टÑीय सुरक्षेसाठी संरक्षण उत्पादनातील स्वावलंबन व स्वयंपूर्णता, वैज्ञानिक ज्ञानसंस्कृतीचा प्रचार व सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या नेतृत्वासाठी व कार्यकर्त्यांसाठी राष्टÑीय भूमिकेतून चिकित्सक व आंतरशाखीय इतिहास संशोधनातून निर्माण झालेल्या इतिहासाची ओळख या पंचसुत्रीवर काम करावे लागेल, असेही ते म्हणाले.यावेळी बोलतांना रवी बेलपाठक म्हणाले, या साहित्य संमेलनामुळे तरूणांना सावरकर समजण्यास मदत होणार आहे.प्रास्ताविक स्वातंत्र्यवीर सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे सरचिटणीस रवींद्र साठे यांनी केले. सूत्रसंचालन नम्रता पाटील, पंकज चौधरी यांनी केले. तर आभार सुभाष अग्रवाल यांनी मानले.संमेलनाला लखन भतवाल, मदनलाल मिश्रा, समर्थ वाग्देवता मंदिराचे अध्यक्ष शरद कुबेर, प्रा. प्रकाश पाठक, भाजपा अध्यक्ष अनुप अग्रवाल,डॉ. माधुरी बाफना, उपमहापौर कल्याणी अंपळकर, माजी महापौर जयश्री अहिरराव, रत्ना बडगुजर, नगरसेविका प्रतिभा चौधरी, रेणुका बेलपाठक, वंदना भामरे, हिरामण गवळी, याच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे