राष्टÑीय शिक्षक पुरस्कार चितोडकर यांना प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 11:47 IST2019-11-15T11:46:49+5:302019-11-15T11:47:29+5:30
गौरव : पाटील, भिलाने यांचाही पुरस्काराने सत्कार

Dhule
दोंडाईचा : शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक प्रशांत चितोडकर यांना महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषदेमार्फत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार नुकताच माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक व केंद्र प्रमुख यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिषदेमार्फत आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण केले जाते. २०१९ या वर्षाचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जि.प. शिक्षक प्रशांत चितोडकर यांना तर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार केंद्रप्रमुख बी.एच. पाटील व दोंडाईचा येथील ज्ञानोपासक शिक्षण मंडळीचे नूतन माध्यमिक विद्यालयातील विज्ञान शिक्षक नारायण भिलाने यांना प्रदान करण्यात आला.या वेळी माजी मंत्री दिपक केसरकर, महात्मा फुले शिक्षण परिषदेचे कार्याध्यक्ष व्यंकटराव जाधव, कार्याध्यक्ष, मुख्याध्यापक गजेंद्र कानडे आदी उपस्थित होते. पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा मान्यवरांचा हस्ते शाल, श्रीफळ, प्रशस्तिपत्रक, सन्मानचिन्ह देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.
संस्थाध्यक्ष माजी मंत्री डॉ.हेमंत देशमुख, डॉ.रविंद्र देशमुख, जुई देशमुख, जितेंद्र गिरासे, नगरसेवक चिरंजीवी चौधरी, पी.डी. तलवारे, जे.पी. पवार, भरत शेळके, खर्दे केंद्र प्रमुख रवींद्र जाधव, महेंद्र कोठावदे, अशोक बाविस्कर, हेमंत कोठावदे आदींनी अभिनंदन केले.