राष्ट्रीय स्तरावरील गुणवंतांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 12:08 PM2020-03-15T12:08:22+5:302020-03-15T12:08:50+5:30

१२ विद्यार्थ्यांचा सहभाग । एस.आर.बी. स्कूलचे विद्यार्थी

National level quality glory | राष्ट्रीय स्तरावरील गुणवंतांचा गौरव

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : तालुक्यातील दहिवद येथील एस.आर.बी.इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांसह सिंगापूर इंटरनॅशनल आॅलम्पियाड परीक्षेत राष्ट्रीयस्तरावर प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी प्रियदर्शनी सुतगिरणीचे चेअरमन भूपेशभाई पटेल, माजी काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष सुभाष कुलकर्णी, अ‍ॅड़सुरेश सोनवणे, मर्चंट बँक चेअरमन प्रसन्न जैन, डॉ.मनोज महाजन, अमृता महाजन, शिंपी समाजाचे तालुकाध्यक्ष नितीन बाविस्कर, जिल्हा न्यायमंडळाचे अध्यक्ष गुलाब निकुंभ, अनिल जाधव, दिलीप सावळे, संस्थेचे अध्यक्ष तुकाराम बाविस्कर, उपाध्यक्षा भाग्यलक्ष्मी बाविस्कर, चेअरमन डॉ.धीरज बाविस्कर, मानसी बाविस्कर, सीईओ सविता तिवारी, प्रशासकीय अधिकारी श्रीराम कुºहेकर आदी उपस्थित होते़
सिंगापूर इंटरनॅशनल आॅलम्पियाड परीक्षेत राष्ट्रीयस्तरावर प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर इयत्ता तिसरीतील पार्थ बाविस्कर याने ब्राझील गणित आॅलम्पियाड परीक्षेत राष्ट्रीयस्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल गौरव करण्यात आला. तसेच शाळेला साउथ एशियन एज्युकेशनतर्फे सर्वोकृष्ट शाळा असे मानांकन प्राप्त केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्षांचा सपत्नीक गौरव करण्यात आला़
संस्थेचे चेअरमन डॉ़धीरज बाविस्कर यांनी यावर्षी सिंगापूर इंटरनॅशनल आॅलम्पियाड परीक्षेत १२ विद्यार्थी आंतरराष्ट्रीयस्तरावर प्रथम आले त्याबद्दल पालकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले़ सुत्रसंचालन करुणा नारखेडे यांनी केले़

Web Title: National level quality glory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे