शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

धुळ्यानजिक महामार्गावर केलेली सळईची परस्पर विल्हेवाट आली अंगलट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 9:48 PM

सुरत जाण्यापुर्वीच हातसफाई : शहर पोलिसात नोंद, दोन संशयितांना केले जेरबंद

धुळे : नागपूर येथील टाटा स्टील यार्ड महेलगाव येथून लोखंडी सळई घेवून गुजरातकडे निघालेल्या ट्रक चालकाने नागपूर ते धुळे शहरातील सुरत बायपास पावेतोच्या प्रवासात अडीच लाख रुपये किंमतीची लोखंडी सळई परस्पर विकून तिची विल्हेवाट लावली़ त्यानंतर चालक ट्रक सोडून पसार झाला़ अशी घटना धुळे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली़ याप्रकरणी दोन जणांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले आहे़सीजी ०४ एचक्यू ९३९७ या ट्रकमध्ये नागपूर येथून ३९ टन ८५० किलो वजनाची लोखंडी सळई भरुन ती सुरत येथे घेऊन जात असताना ट्रक चालक राकेशसिंग इंदरजितसिंग (रा़ हरदुवा, मध्यप्रदेश) याने त्या सळईची रस्त्यातच कोठेतरी विल्हेवाट लावली़ २७ जून ते २ जुलै या कालाधीत ही घटना घडली़ इच्छितस्थळी भरलेला माल न पोहचविता मालकाचा विश्वासघात केला़ सळईची एकूण किंमत १८ लाख ५१ हजार ९३३ रुपये आहे़ त्यापैकी अडीच लाखांची सळईची ट्रक चालकाने परस्पर विल्हेवाट लावून रकमेचा अपहार करत पळून गेला आहे, अशी फिर्याद गुरुदिपसिंग ग्यानसिंग (५३, रा़ छत्तीसगड) या ट्रान्सपोर्ट मालकाने शहर पोलीस ठाण्यात नोंदविली आहे़ घटनेचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत़दरम्यान, परस्पर मालाची विल्हेवाट लावण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे़ मागील आठवड्यातही असा प्रकार पोलिसांनी उघड केला होता़अवघ्या काही तासात दोन संशयित जेरबंद, चौकशी सुरुफिर्याद दाखल होताच शहर पोलिसांच्या शोध पथकाने दोन जणांना ताब्यात घेतले आहे़ गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांची चौकशी सुरु झाली आहे़ पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील, श्रीकांत पाटील, संतोष तिगोटे, सहायक पोलीस उपनिरीक्षक नाना आखाडे, प्रकाश पाटील, हेड कॉन्स्टेबल भिका पाटील, पोलीस कर्मचारी मुक्तार मन्सुरी, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, रविंद्र गिरासे, कमलेश सूर्यवंशी, पंकज खैरमोडे, राहुल गिरी, तुषार मोरे, सचिन साळुंखे, नरेंद्र परदेशी, नितीन अहिरे, निलेश पोतदार यांनी कारवाई केली़ गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल शहर पोलिसांच्या पथकाने जप्त केलेला आहे़ घटनेचा तपास सुरु आहे़

टॅग्स :Dhuleधुळे