शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना मारुन स्वत: आत्महत्या करणाऱ्या मृत महिलेविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 21:26 IST

साक्री येथील आदर्श नगरातील थरार : जुलैमधील घटनेचा तपास धुळे - साक्री येथील आदर्श नगरात तीन वर्षीय भाग्यश्री आणि ...

साक्री येथील आदर्श नगरातील थरार : जुलैमधील घटनेचा तपासधुळे - साक्री येथील आदर्श नगरात तीन वर्षीय भाग्यश्री आणि पाच वर्षीय रिया या दोन मुलींना मारुन टाकल्यानंतर घरातच स्वत:ने गळफास घेऊन अनिता शिंदे या महिलेने आपले जीवन संपविले़ हे प्रकरण २३ जुलै २०२० रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडले होते़ याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता़ तपासाअंती ही महिलाच मुलाच्या मृत्यूला कारणीभूत असल्याने मयत अनिता पंकज शिंदे (२८, रा़ आदर्श नगर, साक्री) या मृत महिलेविरुध्द भादंवि कलम ३०२ प्रमाणे १६ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता दाखल करण्यात आला़साक्री शहरातील आदर्श नगरात राहणारे पंकज शिंदे हे आपल्या पत्नी व दोन मुलींसह राहतात. ते फर्निचर तयार करण्याचे काम करतात. काही दिवसापूर्वीचे त्यांचे सासरे मृत अनिताचे वडील काशिनाथ जाधव रा. पोहाणे ता.मालेगाव येथून साक्रीला राहण्यासाठी आले होते. दोघेही फर्निचरचे काम करण्यासाठी सोबत जायचे. सध्या शहरातील बस स्थानकासमोरील एका दुकानात फर्निचरचे काम सुरु होते. नेहमीप्रमाणे सकाळी दोघे फर्निचरच्या कामासाठी घरातून निघाले. तेव्हा घरात अनिता आपल्या दोन्ही मुलींसह एकटी होती. २३ जुलै २०२० रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास दोघेही जेवणासाठी आदर्श नगरात आपल्या घरी आले. तेव्हा घराचा दरवाजा उघडा होता. घरात गेल्यावर दोघांना भीषण दृष्य दिसले. घरात अनिताने आपल्या दोन्ही मुलींसह गळफास घेतला होता.काशिनाथ जाधव चक्कर येऊन जमिनीवर कोसळले - मुलगी व दोन्ही नातींना गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून काशिनाथ जाधव हे चक्कर येऊन जमिनीवर कोसळले आणि बेशुद्ध झाले. तर पंकजने शेजारच्या लोकांना बोलावून आधी पोलिसांना माहिती दिली. पोलीस आल्यानंतर त्यांच्या मदतीने तिघांना खाली उतरविण्यात आल्यानंतर तिघांचे मृतदेह साक्री रुग्णालयात पाठविण्यात आले होते़नातेवाईकांचा आक्रोश -साक्री पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तिघांचे मृतदेह साक्रीच्या ग्रामीण रुग्णालयात आणले गेले. यावेळी मृतांचे नातेवाईक यांनी एकच आक्रोश केला होता. एका आईने आपल्या पोटच्या गोळ्यांना अशाप्रकारे संपविल्याने त्यांच्यावर असे कोणते मोठे संकट आले होते, हे मात्र कळायला मार्ग नाही़ घरात पतीचा किंवा अन्य कोणाचाही त्रास नसल्याचेही समोर आले़ कारण मृत महिलेचे वडील व जावाई एकत्रितच काम करत होते. त्यामुळे या घटनेचे गूढ अधिकच वाढले होते़आधी मुलींना गळफास दिल्याची शक्यता - मृत अनिता हिने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या दोन्ही लहान मुलींना गळफास देऊन मारले असावे असा प्रथमदर्शनी संशय व्यक्त होत होता़ पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाला सुरुवात झाली़ तपासाअंती दोन्ही मुलींना मारुन स्वत: आत्महत्या केल्याने या मृत अनिता विरुध्द भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला़ पोलीस निरीक्षक दिनेश आहेर घटनेचा तपास करीत आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे