शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

मुक्या जिवांना मिळाला पुलाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 13:09 IST

संधीचे सोने : सुरत-नागपूर महामार्गाचे काम रखडल्याने झाली गुरांची सोय

धुळे : येथील चितोड गावाजवळ असलेला उड्डाणपुल पावसाळ्यात मुक्या जिवांसाठी आधार ठरत आहे़ सुरत-नागपूर महामार्गाचे काम गेल्या काही महिन्यांपासून रखडले असून गावातील एका गुराख्याने संधीचे सोने करीत प्रगतीत असलेल्या या पुलाचा गुरांचा गोठा म्हणून वापर करण्यास सुरूवात केली आहे़दरवर्षी पावसाळ्याच्या आधी गुरांच्या गोठ्याची आणि छताची दुरूस्ती करण्याचे काम ग्रामीण भागात प्राधान्याने हाती घेतले जाते़ पावसाच्या पाण्याचा मारा आणि विजांपासून संरक्षण व्हावे यासाठी बऱ्याचदा नव्याने गोठा बांधला जातो़ असे असले तरी गुरांचा गोठा हा झोपडीप्रमाणे छपºयाचा असतो़ त्यामुळे पावसाच्या पाण्यापासून गुरांचे फारसे संरक्षण होत नाही़ गोठ्यात पाणी शिरते आणि चिखल होतो़यंदाच्या पावसाळ्यात मात्र चितोड गावातील गुरांचे नशिब उजळल्याचे दिसत आहे़ कारण या गुरांना पारंपारिक गोठा नव्हे तर आरसीसी बांधकाम असलेला प्रशस्त असा हवेशीर आयता गोठा मिळाला आहे़ सुरत-नागपूर महामार्गावर काम बंद पडलेल्या उड्डाणपूलाच्या खाली गुराख्याने आपल्या गुरांची चांगली सोय केली आहे़ उड्डाणपूलाचे काम उंचावर असल्याने आत पाणी शिरण्याची शक्यता नाही़ या गोठ्यात गुरांचे उन्हाळ्यात उन्हापासून संरक्षण झाले़ आता पावसाळ्याचीही सोय झाली़ विशेष म्हणजे या गोठ्यात एका गायीने वासरुला जन्म दिल्याने या गोठ्याला घरपण आले आहे़

टॅग्स :Dhuleधुळे