आॅनलाइन लोकमतधुळे : शहरातील कुमारनगर भागात एका विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना २५ रोजी रात्री ९.३० ते १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी संशयिताविरूद्ध धुळे शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.संशयित आरोपी गुलशन ओमप्रकाश उदासी (रा. कुमारनगर भाजीमार्केट, साक्रीरोड धुळे) हा पिडीतेच्या घराबाहेर येत तिला पती आहे का अशी विचारणा केली. पीडीत महिला घरी एकटी असल्याची संधी साधत संशयित आरोपीने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. पीडीतेने विरोध करताच, त्याने तिचा हात धरून विनयभंग केला. घटनास्थळी धुळ्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन हिरे, पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, पोलीस उपनिरीक्षक एम.एच. सैय्यद यांनी भेट दिली.पीडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला गुलशन उदासी याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक एम.एच.सैय्यद करीत आहेत.
धुळे येथे विवाहितेचा विनयभंग, एकाविरूद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 17:38 IST
पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट
धुळे येथे विवाहितेचा विनयभंग, एकाविरूद्ध गुन्हा दाखल
ठळक मुद्देविवाहितेचा विनयभंग केल्याची घटना २५ रोजी रात्री ९.३० ते १० वाजेच्या सुमारास घडलीआरोपीने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.